तडाखेबंद फलंदाज ऋतुराज गायकवाड सध्या चांगल्याच फॉर्मात आहे. विजय हजारे वनडे स्पर्धेत त्याने सलग तिसऱ्या शतकाची नोंद केली आहे. हे तिसरे शतक त्याने केरळविरुद्ध नोंदविले. त्याआधी, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश यांच्याविरुद्ध खेळताना त्याने शतकी खेळी केली होती. महाराष्ट्राच्या संघाने ऋतुराजच्या या शतकी खेळीच्या जोरावर केरळला नमविले.
इंडियन प्रीमियर लीगमध्ये चमकदार कामगिरी करणारा ऋतुराज विजय हजारे वनडे स्पर्धेतही चमक दाखवत आहे. केरळविरुद्ध खेळताना प्रथम फलंदाजी करताना महाराष्ट्राचे नाहर (२) आणि अंकित बावणे (९) हे झटपट बाद झाल्यावर ऋतुराज आणि राहुल त्रिपाठी यांनी तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. दोघांनी १९५ धावा जोडल्या. त्यात ऋतुराजने आपले शतक पूर्ण केले पण राहुल त्रिपाठीला मात्र शतकासाठी एक धाव कमी पडली.
या दोघांच्या भागीदारीमुळे महाराष्ट्राचा संघ २ बाद २२ वरून २१७ धावापर्यंत पोहोचला. त्यात राहुल त्रिपाठीने १०८ चेंडूंत ११ चौकारांसह ९९ धावा केल्या. तर ऋतुराजने ११९ चेंडूत ८ चौकार आणि ३ षटकारांसह ११० धावांची खेळी केली.
हे ही वाचा:
‘पर्यावरण मंत्र्यांची समुद्र किनाऱ्यासाठी काम करण्याची इच्छा दिसत नाही’
‘घोटाळा केला असेल तर तुम्हीच सरकारी पाहुणे व्हाल’
ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्थानकाचा होणार पुनर्विकास
ऋतुराजने छत्तीसगडविरुद्ध १४३ चेंडूंत नाबाद १५४ धावा केल्या. त्यातली ८६ धावा तर १४ चौकार आणि पाच षटकांरांच्या सहाय्याने झाल्या. मध्य प्रदेशविरुद्ध ३२९ धावांचा पाठलाग करताना महाराष्ट्राच्या ऋतुराजने १४ चौकार आणि चार षटकारांसह ११२ चेंडूंत १३६ धावा केल्या.