रशियन बॅरेजने विविध प्रकारच्या ४० हून अधिक क्षेपणास्त्रांसह पाच युक्रेनियन शहरांना लक्ष्य केले. यामध्ये सुमारे सात जणांचा मृत्यू झाला आहे. किव्मधील मुलांच्या रुग्णालयावर हल्ला करण्यात आला. तर मध्य युक्रेनियन शहरातील क्रिव्ही रिह येथे झालेल्या दुसऱ्या हल्ल्यात किमान १० जण ठार झाले.
सोमवारी सकाळी झालेल्या हल्ल्यात देशभरात किमान २० लोक ठार झाले आणि सुमारे ५० लोक जखमी झाले, असे गृहमंत्री इहोर क्लायमेन्को यांनी सांगितले. क्रिव्ही रिहमध्ये १० मृत्यू शिवाय ३१ जण जखमी झाले. शहर प्रशासन प्रमुख, ओलेकसंदर विल्कुल यांनी हा प्रचंड क्षेपणास्त्र हल्ला असल्याचे सांगितले.
हेही वाचा..
वरळी कार अपघात प्रकरण, राजेश शाहला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी!
रायगडमध्ये ढगफुटी सदृश पाऊस; किल्ल्याच्या पायऱ्यांना धबधब्याचं स्वरुप
जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून लष्कराच्या वाहनावर गोळीबार
खोट्या बातम्या देणाऱ्या मुस्लीम पत्रकारांवर गुन्हा
कीवमधील ओखमातडीत मुलांच्या रुग्णालयावर हल्ला करण्यात आला. जगाने आता याबद्दल गप्प बसू नये आणि रशिया काय आहे आणि ते काय करत आहे हे प्रत्येकाने पाहिले पाहिजे, असे झेलेन्स्की सोशल मीडियावर म्हणाले. वॉशिंग्टनमध्ये तीन दिवसीय नाटो शिखर परिषदेच्या पूर्वसंध्येला हा हल्ला झाला आहे.
मुलांच्या रुग्णालयातील दुमजली इमारत अर्धवट उद्ध्वस्त झाली असून रुग्णालयाच्या मुख्य १० मजली इमारतीच्या खिडक्या आणि दरवाजे उडाले आणि भिंती काळ्या पडल्या आहेत. वैद्यकीय कर्मचारी आणि स्थानिक लोकांनी ढिगारा हलवून अडकलेल्या मुलांचा आणि कर्मचाऱ्यांचा शोध घेतला. तिथे इमारतीतून अजूनही धूर येत असून तोंडाला मास्क घालून स्वयंसेवक आणि आपत्कालीन कर्मचारी यांना काम करावे लागत होते.
कीववर जवळपास चार महिन्यांतील रशियन बॉम्बस्फोट हा सर्वात मोठा होता. युक्रेनच्या हवाई दलाने सांगितले की, हल्ल्यांमध्ये किंझल हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांचा समावेश होता. स्फोटांमुळे शहरातील इमारती हादरल्या. कीवमधील एका जिल्ह्यातील निवासी बहुमजली इमारतीचा संपूर्ण भाग उद्ध्वस्त झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. युक्रेनच्या अध्यक्षीय कार्यालयाचे प्रमुख आंद्री येरमाक यांनी सांगितले की, हा हल्ला अशा वेळी झाला जेव्हा अनेक लोक शहरातील रस्त्यावर होते. कीवचे महापौर विटाली क्लिट्स्को म्हणाले की हल्ल्याच्या परिणामांचे अधिकृत मूल्यांकन अद्याप केले जात आहे.