रशियात एक मोठी दुर्घटना घडल्याची घटना समोर आली आहे. रशियन हेलिकॉप्टर उड्डानंतर बेपत्ता झाल्याची माहिती आहे. बेपत्ता झालेल्या हेलिकॉप्टरमध्ये एकूण २२ सदस्य असल्याची माहिती आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रशियाच्या Mi-८T हेलिकॉप्टरने शनिवारी रशियाच्या पूर्व भागात असलेल्या कामचटका पेनिन्सुला येथून उड्डाण केले होते. हेलिकॉप्टरमध्ये तीन क्रू मेंबर्ससह एकूण २२ जण होते. रशियाच्या फेडरल एअर ट्रॅफिक एजन्सीने सांगितले की, निकोलायव्हका गावाकडे जाण्यासाठी हेलिकॉप्टरने वाचकाझेट्स तळावरून उड्डाण केले होते, परंतु हेलिकॉप्टर वेळेवर त्याच्या गंतव्यस्थानावर पोहोचलेच नाही, त्यामुळे शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्याच बरोबर, एका तपास समितीने हवाई वाहतूक सुरक्षा नियमांचे आणि विमान चालवण्याच्या संभाव्य उल्लंघनाची चौकशी सुरू केली आहे.
हे ही वाचा :
चंपाई सोरेन यांच्यानंतर लोबिन हेमब्रमही भाजपमध्ये दाखल !
पत्राचाळ प्रकरण: फडणवीसांचे नाव घेण्यासाठी दिली होती धमकी
राहुल, अखिलेश आणि तेजस्वी यांचे सरकार बनले तर भारताचा पाकिस्तान-बांगलादेश होईल !
राहुल द्रविडच्या मुलाची टीम इंडियात निवड, ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार सामना !
दरम्यान, Mi-८T हे ट्विन-इंजिन हेलिकॉप्टर आहे, ज्याची रचना १९६० मध्ये करण्यात आली होती. रशियाशिवाय हे हेलिकॉप्टर इतरही अनेक देश वापरतात, मात्र या हेलिकॉप्टरला अपघातांचाही मोठा इतिहास आहे.