रशियात भीषण अपघात; रेल्वेचे नऊ डबे रुळांवरून घसरले!

७०हून अधिक प्रवासी जखमी

रशियात भीषण अपघात; रेल्वेचे नऊ डबे रुळांवरून घसरले!

रशियात प्रवासी रेल्वेचे नऊ डबे रेल्वेरुळांवरून घसरल्यामुळे झालेल्या अपघातात ७०हून अधिक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. रशियातील स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, यातील सात प्रवाशांची अवस्था नाजूक आहे. अपघातात जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

ही प्रवासी रेल्वे वोरकुटापासून नोवोरोस्सिएस्कमधील ब्लॅक सी बंदरात जात होती. दोन्ही ठिकाणांमधील अंतर पाच हजार किमी आहे. ज्या रेल्वेचा अपघात झाला, त्या रेल्वेचे नाव ट्रेन ५११ असे आहे. नुकत्याच पडलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वेचे डबे रुळांवरून घसरले असावे, असे मानले जात आहे. या रेल्वेमध्ये एकूण १४ डबे होते. त्यात २३२ प्रवासी प्रवास करत होते.

हे ही वाचा:

मणिपूरमध्ये अवैध प्रवाशांना बनावट आधार कार्ड आणि ओळखपत्रे!

माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी ‘एम्स’मध्ये !

केजरीवालांना सीबीआय कोठडीत भगवद्गीता बाळगण्याची परवानगी

ठाणे, मीरा-भाईंदरमधील अनधिकृत बार, पब्सवर बुलडोझर फिरवण्याचे निर्देश

हा अपघात स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी सहा वाजून १२ मिनिटांनी इंटा शहराजवळ घडला. अपघाताचे वृत्त कळताच संबंधित अधिकारी आणि बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी प्रवाशांच्या मदतीसाठी सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच, या विभागातील रेल्वेवाहतूक थांबवण्यात आली आहे. जखमी प्रवाशांची माहिती घेतली जात आहे. या रेल्वे अपघाताच्या चौकशीसाठी महासंचालक ओलेग बेलोजेराव यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. या टास्क फोर्सकडून या अपघाताची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

Exit mobile version