पुढील महिन्यात नरेंद्र मोदी भेटणार पुतिन यांना!

रशियन मीडियाचा दावा

पुढील महिन्यात नरेंद्र मोदी भेटणार पुतिन यांना!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच इटलीला भेट दिली, जिथे त्यांनी जी-७ शिखर परिषदेत भाग घेतला आणि अनेक नेत्यांशी द्विपक्षीय चर्चाही केली. त्या परिषदेत रशिया-युक्रेन युद्धाचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला होता. दरम्यान, पंतप्रधान मोदी पुढील महिन्यात रशियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत, जिथे ते त्यांचे खास मित्र राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्याच्या तयारीत रशिया व्यस्त असल्याची माहिती समोर आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. कारण युक्रेन युद्धानंतर पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच रशियाला जाणार आहेत. यामध्ये घेतलेल्या निर्णयांचा संपूर्ण जगावर परिणाम होईल. तज्ज्ञांच्या मते, पाश्चात्य देश सुद्धा आशा लावून बसले आहेत की, पंतप्रधान मोदी युक्रेन युद्धाबाबत राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्याशी बोलू शकतील. रॉयटर्सने रशियन सरकारी वृत्तसंस्था आरआयएच्या हवाल्याने म्हटले आहे की, पंतप्रधान मोदींचा दौरा जुलैमध्ये होण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा:

जामीन मिळाला असला तरीही दोषीवर कारवाई करणारच !

पवार, ठाकरे, जरांगेंचे गलिच्छ राजकारण चालू देणार नाही!

“के सुरेश यांना नामनिर्देशित करणं हा काँग्रेसचा एकतर्फी निर्णय”

गावबंदीची उठाठेव कशाला? ओबीसींचे आंदोलन ‘जरांगे’ मार्गाने जायला नको…

दरम्यान, जर पंतप्रधान मोदींचा पुढील महिन्यात रशियन दौरा ठरला तर २०१९ नंतर आणि रशिया-युक्रेनच्या युद्धाच्या सुरवातीनंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिला रशिया दौरा असेल. भारत-रशिया शिखर संमेलनासाठी राष्ट्रपती पुतीन हे २०२१ मध्ये नवी दिल्लीमध्ये आले होते. गेल्या दोन वर्षांपासून या वार्षिक संमेलनाचे आयोजन करण्यात आलेले नाही. पंतप्रधान मोदी यांनी १६ सप्टेंबर २०२२ रोजी उझबेकिस्तानमधील समरकंद येथे शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन शिखर परिषदेच्या बाजूला पुतिन यांची शेवटची भेट घेतली होती. त्यामुळे पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्यावर सर्वांचे लक्ष लागून आहे.

Exit mobile version