रशियात मोदींचे जंगी स्वागत, ‘खाऊ घातली चक-चक मिठाई’

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दोन दिवसीय दौरा

रशियात मोदींचे जंगी स्वागत, ‘खाऊ घातली चक-चक मिठाई’

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर आहेत. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान मोदींना ब्रिक्स शिखर परिषदेत (BRICS Summit) सहभागी होण्यासाठी आमंत्रण दिले होते. याच पार्श्वभूमीवर आज मोदी रशियाला पोहोचले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाला पोहोचताच त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. एवढेच नाहीतर त्यांना यावेळी खास रशियाचे पारंपारिक पदार्थ खाऊ घालण्यात आले. याचे फोटो देखील समोर आले आहेत, ज्यामध्ये पंतप्रधान मोदींच्या स्वागतार्थ खाद्यपदार्थ घेवून रशियन महिला उभ्या आहेत.

पत्रकार प्रणय उपाध्याय यांनी यासंबंधीचे ट्विट केले आहे. यात त्यांनी या पदार्थांबाबत काही माहितीही सांगितली आहे. त्यांनी लिहिले, “रशियन तातार परंपरेनुसार, पाहुण्यांचे स्वागत ‘ब्रेड-मीठ’ आणि ‘चक-चक’ मिठाईने केले जाते. ताटात लाह्यांच्या लाडू प्रमाणे दिसणारा हा पदार्थ चक-चक मिठाई आहे. चक-चक हे पीठाच्या शेवया तळून मध-साखरेच्या पाकात घोळवून तयार केले जाते.”

हे ही वाचा : 

रशिया- युक्रेनमध्ये शांततेसाठी भारत सर्व प्रकारचे सहकार्य करण्यास तयार

शंभर कोटी वसुली प्रकरणामध्ये सचिन वाझेला जामीन पण मुक्काम तुरुंगातच

ठाकरे पुन्हा तीच खेळी खेळतायत…

आरजी कार पीडीतेच्या वडिलांनी मागितली अमित शहांकडे वेळ

दरम्यान, रशियातील कझान येथे आयोजित केल्या जाणाऱ्या १६ व्या ब्रिक्स शिखर संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. ब्रिक्स परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदी आणि जिनपिंग यांच्यात भेट होऊ शकते, असेही सांगण्यात येत आहे.

Exit mobile version