31 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरविशेषमाळशेज, भंडारदरा, राजमाजीत गर्दीचे धबधबे

माळशेज, भंडारदरा, राजमाजीत गर्दीचे धबधबे

Google News Follow

Related

टाळेबंदीमुळे आणि निर्बंधजाचामुळे बंदीस्त असलेला मुंबईकर आता मोकळा श्वास घेऊ लागलेला आहे. सलग तीन दिवस आलेल्या सुट्ट्यांकरता मुंबईकर आता मुंबईबाहेर पडलेला आहे. त्यामुळेच आता पर्यटनासाठी मुंबईकरांनी जवळच्या ठिकाणांना जाणे पसंत केले आहे. लोणावळा, अलिबाग, नाशिक आणि मुंबईच्या आसपास रिसॉर्टवर पर्यटक जात असल्याचे निदर्शनास येत आहे. मुंबईनजिकचे अनेक पिकनिक स्पॉट आता ओसंडून वाहू लागले आहेत.

निर्बंधांच्या कचाट्यात अडकलेले नागरिक आता मोकळे झाले आहेत. मुंबईनजिक असणारे लोणावळा, अलिबाग आता पर्यटकांनी फुलून निघाले आहे. येथील अनेक बंगल्यांना आता मागणी वाढली आहे. केवळ पर्यटनच नाहीतर, ट्रेकिंगसाठी सुद्धा तरुणाई आता निघालेली दिसत आहे. माळशेज घाट , नाणे घाट, भंडारदरा, कळसुबाई, रतनगड, राजमाची, तिकोना, कलावंतीण, हरिहर, रामशेज, पांडव लेणी, माहुली, गोरखगड अशा कर्जत, नाशिक, मुरबाड, इगतपुरी, पनवेल, लोणावळा भागातील ट्रेकिंगच्या ठिकाणांना अधिक पसंती आहे.

गेले काही महिन्यांमध्ये असलेले कठोर निर्बंध त्यामुळे पर्यटन सुरु नव्हते. सध्या निर्बंधबंदी उठल्यामुळे आता अनेकांनी ट्रेकिंग तसेच बाहेर जाण्याची पसंती दर्शवली आहे. अनेक तरुणांचे जथ्थे सध्या पावसाळी पिकनिकसाठी आणि ट्रेकसाठी सुद्धा आता बाहेर पडू लागले आहेत.

सध्याच्या घडीला मनोरंजनाची माध्यमे, उपहारगृहे, पर्यटनस्थळे यांना करोनामुळे टाळे लागल्याने मौजेसाठी कोणताही पर्याय नागरिकांपुढे नव्हता. परंतु राज्यातील बहुतांश जिल्ह्यांतील निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळेच आता मुंबईकरांनीही मुंबईबाहेरचा रस्ता पकडलेला आहे. मुख्य म्हणजे १५ ऑगस्ट पासून हॉटेल, उपहारगृहे यांनाही रात्री १० पर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आल्याने नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

हे ही वाचा:

गोवंश टिकवा, संस्कृती टिकवा!

अरेरे! चोर समजून केलेल्या मारहाणीत मृत्यू

अतिक्रमणे हटवा, गांधी मैदान वाचवा!

काय होता इस्रोचा ‘तिसरा डोळा’?

जोडून सुट्या आल्यामुळे मुंबईपासून जवळ असलेले धबधबे, समुद्र किनारे, रिसॉर्ट अशा ठिकाणांना पसंती मिळत आहे. पुढील दोन दिवस लोणावळा, कर्जत, माथेरान, अलिबाग, नाशिक येथील बऱ्याच हॉटेलांना १०० टक्के मागणी आहे. कृषी पर्यटन स्थळांनाही पर्यटकांची पसंती आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा