मुंबईत ‘रन फॉर विवेकानंद’ मॅरेथॉनचे आयोजन!

विवेकानंद युथ कनेक्ट फाऊंडेशकडून आयोजित मॅरेथॉनची ही ८ वी आवृत्ती आहे

मुंबईत ‘रन फॉर विवेकानंद’ मॅरेथॉनचे आयोजन!

‘रन फॉर विवेकानंद’ मॅरेथॉनची ८ वी आवृत्ती पुढील महिन्यात शनिवार, २३ डिसेंबर २०२३ रोजी मुंबईत होणार आहे.मुंबईच्या शाश्वततेचा संदेश देण्यासाठी विवेकानंद युथ कनेक्ट फाऊंडेशनने या विशेष मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.

स्वामी विवेकानंद यांच्या १६१ व्या जयंती निमित्त व राष्ट्रीय युवा दिनानिमित्त मुंबईत मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.’रन फॉर विवेकानंद’ मॅरेथॉनची हि ८ वी आवृत्ती असणार आहे.विवेकानंद युथ कनेक्ट फाऊंडेशकडून या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले असून शनिवारी २३ डिसेंबर रोजी ही मॅरेथॉन पार पडणार आहे. मुंबईतील जुहू चौपाटीवर ही मॅरेथॉन होणार आहे.या मॅरेथॉन मध्ये १० किमी अंतर धावणे आणि ५ किमी अंतर धावणे असे दोन भाग केले आहेत.
१० किमी मॅरेथॉनमध्ये १५ ते ३० वर्षे,३१ ते ४० वर्षे, ४१ ते ५० वर्षे, ५१ वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटातील स्पर्धकांना भाग घेण्यासाठी गट केले आहेत.५ किमी अंतर मॅरेथॉनमध्ये १४ ते २५ वर्षे, २६ ते ३५ वर्षे, ३६ ते ५० वर्षे, ५१ वर्ष आणि त्यावरील वयोगटातील स्पर्धक भाग घेऊन शकतात.

मुंबईतील जुहू चौपाटीवरील बिर्ला गार्डन, बिर्ला लेन जुहू बीच येथे मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. मॅरेथॉनची सुरुवात जुहू चौपाटी बस डेपो येथून होणार आहे व त्याचा शेवट सिटीझन हॉटेल समोर होणार आहे.मॅरेथॉनची नियोजित वेळ सकाळी ११ ते संध्याकाळी ६ पर्यंत ठेवण्यात आली आहे.जगाला आज येणाऱ्या पिढयांना शाश्वत बनवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नांची गरज आहे.

हे ही वाचा:

अबब! मोबाईल नाहीतर अख्खा मोबाईल टॉवरच गेला चोरीला!

बेंगळुरूमधील १५ शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी!

इस्रायलकडून हमासवर पुन्हा हल्ले सुरू!

नक्षलवाद्यांचे ‘हमास’ला समर्थन; महाराष्ट्र- छत्तीसगड सीमेवर लावले फलक

त्यासाठी आपण सर्वांनी मिळून जागरूकता ते कृती ते शाश्वत वाढ साध्य करण्यासाठी कृती करण्याचे आवाहन विवेकानंद युथ कनेक्ट फाऊंडेशकडून करण्यात आले आहे.विवेकानंद युथ कनेक्ट फाऊंडेशकडून करण्यात आलेल्या ‘रन फॉर विवेकानंद’ मॅरेथॉनची ८ वी आवृत्ती आहे.जास्तीत-जास्त स्पर्धकांनी मॅरेथॉन मध्ये सहभागी होण्याचे विवेकानंद युथ कनेक्ट फाऊंडेशकडून आवाहन करण्यात आले आहे.

टीप: रेसच्या दिवशी किंवा नियोजित वेळेबाहेरील कोणत्याही दिवशी किंवा वेळी, कोणतेही रेस किट/बिब/टी शर्ट दिले जाणार नाहीत याची कृपया नोंद घ्यावी!

Exit mobile version