संगीतकार आणि गायक ए. आर. रहमान सध्या त्यांच्या ‘वंडरमेंट’ संगीत कॉन्सर्टच्या तयारीत व्यस्त आहेत. या दरम्यान त्यांनी संवाद साधला आणि खाजगी आयुष्याशी संबंधित अफवा मानसिक आरोग्यावर कसा परिणाम करतात, याबद्दल स्पष्टपणे मत व्यक्त केले. इंटरव्ह्यूमध्ये रहमान यांनी ‘वंडरमेंट’ टूरची तयारी, संगीतामधील एआयचा वापर, अफवा आणि मानसिक स्थितीवर होणाऱ्या परिणामांविषयी उघडपणे चर्चा केली.
जेव्हा त्यांना विचारण्यात आले की, “संगीतासाठी मन आनंदी असणे आवश्यक असते, अशा परिस्थितीत तुमच्याबाबतच्या अफवा तुम्हाला प्रभावित करतात का?” यावर रहमान म्हणाले, “माझ्या मते, अफवांचा परिणाम होतो आणि प्रत्येक कलाकार अशा परिस्थितीतून जातो. अफवा मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम करतात. त्या परिस्थितीत अडकलेले कलाकार दुखी आणि अस्वस्थ असतात, आणि अशाही वेळी त्यांना काम करावे लागते. त्या स्थितीतसुद्धा त्यांना ‘छैय्या छैय्या’ किंवा ‘हम्मा हम्मा’सारखे गाणे सादर करावे लागते. गायक असो वा इतर कोणी, अशा वेळी तुम्ही एक अभिनेत्यासारखे वागता — मनात दु:ख असूनही, चेहऱ्यावर आनंद दाखवावा लागतो.
हेही वाचा..
‘नॅशनल हेराल्ड’ : आर्थिक गैरव्यवहारावर सरदार पटेल यांनीही नेहरूंना दिली होती चेतावणी…
नॅशनल हेराल्ड प्रकरण म्हणजे दरोडा, सोनिया गांधी, राहुल गांधी आधुनिक दरोडेखोर”
पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढला !
रॉबर्ट वाड्रा हे भू-माफिया, शेतकऱ्यांना लुटण्याची त्यांनी शपथ घेतलीय!
जेव्हा त्यांच्याकडून विचारले गेले की, “तुमच्याबाबत अफवा पसरवल्या गेल्यावर तुम्हाला कसे वाटते?” त्यावर त्यांनी थोड्या हलक्याफुलक्या अंदाजात उत्तर दिले, “असल्या गोष्टींचा परिणाम होतो, पण माझ्या मते हे जीवनाचा एक भाग आहे. जीवनात चढउतार येतच राहतात.” काही काळापूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली होती, ज्यात असा दावा करण्यात आला होता की, रहमान आणि त्याच्या बँडची गिटारिस्ट मोहिनी डे यांच्यात संबंध आहेत.
या अफवेने त्रस्त होऊन रहमान यांनी एक अधिकृत निवेदन जारी केले होते. त्यांनी यामध्ये आपल्या बदनामी करणाऱ्या अफवा पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. आपल्या तब्येतीबाबतही रहमान यांनी चाहत्यांशी संवाद साधला. त्यांनी एक संदेश शेअर केला होता – “तुमच्या प्रेमासाठी धन्यवाद. मी तुम्हाला चिंतेत टाकल्याबद्दल क्षमस्व. तुमच्या प्रार्थना आणि प्रेमामुळे मी आता बरा आहे. डीवाय पाटील स्टेडियममध्ये लवकरच भेटू. मार्च महिन्यात रहमान यांच्या छातीत दुखत असल्याची तक्रार होती, त्यामुळे त्यांना चेन्नईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.