पुणे रेल्वे स्थानकावर बॉम्ब सदृश्य वस्तू नाहीच

पुणे रेल्वे स्थानकावर बॉम्ब सदृश्य वस्तू नाहीच

शुक्रवार, १३ मे रोजी दुपारच्या सुमारास पुण्यातून आलेल्या एका बातमीने राज्यभर खळबळ उडाली. पुणे पोलिस स्थानकाच्या आवारात बॉम्ब सदृश्य वस्तू आढळल्याचे वृत्त समोर आले. पण नंतर ही वस्तू बॉम्ब सदृश्य वस्तू नसल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले.

या बॉम्ब सदृश्य रेल्वे प्रशासनाने पुणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एक आणि फलाट क्रमांक दोन पूर्णपणे रिकामे केले. या संपूर्ण काळासाठी रेल्वेची वाहतूक थांबवण्यात आली. गोंधळ उडून कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची संपूर्ण खबरदारी घेतली गेली.

हे ही वाचा:

‘सत्तेसाठी ठाकरे सरकारने हिंदुत्व गहाण ठेवले’

कराची बाजारपेठेत स्फोट; तीन ठार

एनआयएच्या अतिरिक्त पोलीस महासंचालक पदी अतुलचंद्र कुलकर्णींची नियुक्ती

कराची बाजारपेठेत स्फोट; तीन ठार

या संपूर्ण प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांचे पथकही घटनास्थळी दाखल झाले. ही बॉम्ब सदृश्य वस्तू ताब्यात घेत निकामी करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. सुरुवातीला या तीन जिलेटिनच्या कांड्या असल्याचे वृत्त समोर आले होते. पण नंतर ही वस्तू बॉम्ब नसल्याचे पोलिस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी माध्यमांना यासंबंधीची माहिती दिली. सर्व परिस्थिती नियंत्रणात असून नागरिकांनी घाबरण्याची आवश्यकता नाही असे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे. तर पुणे रेल्वे स्थानकावरील सर्व रेल्वे वाहतूक पुन्हा सुरळीतपणे सुरु करण्यात आली आहे. दरम्यान ही वस्तू नेमकी काय होती हे अद्यापही समोर आले नसून पुणे पोलीस या संदर्भात शोध घेत आहेत.

Exit mobile version