भारताच्या रुद्रांक्ष बाळासाहेब पाटील, किरण अंकुश जाधव आणि अर्जुन बाबुता या त्रिकुटाने रविवारी येथे आयएसएसएफ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांच्या दहा मीटर एअर रायफल विजेतेपदाच्या लढतीत चीनचा पराभव करून भारताचे पाचवे पदक जिंकले आहे.
सीनियर स्तरावरील पहिल्या जागतिक चॅम्पियनशिपमधील रुद्रांक्षचे हे दुसरे सुवर्णपदक आहे. याआधी त्याने वैयक्तिक स्पर्धेत १० मीटर रायफलमध्येही सुवर्णपदक जिंकले होते. महिलांच्या १० मीटर एअर पिस्तुल संघानेही सुवर्णपदकाच्या लढतीत प्रवेश केला आणि भारताचे आणखी एक पदक निश्चित केले आहे.
अंतिम फेरीत भारताने चीनविरुद्धच्या यांग हाओरान (दोन वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता आणि दोन वेळा विश्वविजेता), लिहाओ शेंग (टोकियो ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता) आणि सॉन्ग बुहान (जागतिक चॅम्पियनशिप रौप्यपदक विजेते) यांचा पराभव केला आहे. त्यानंतर चीनच्या संघाने जोरदार पुनरागमन करत पुढील चार मालिका जिंकून गुणसंख्या १०-१४ अशी केली. मात्र त्यानंतर भारतीय नेमबाजांनी संयम राखला आणि पुढील मालिका जिंकून सुवर्णपदक पटकावले आहे.
हे ही वाचा
बोरिवली ते ठाणे प्रवास आता तासात नाही मिनिटांत
रुद्रांक्ष पाटीलचा ‘ऑलिम्पिक वेध’
नर्मदा परिक्रमेचे अनुभव ऐकताना उपस्थितांना भरून आले
‘एकता कपूर बिघडवत आहे तरुणाईला!’
मानवी जैन आणि समीर यांनी २५ मीटर स्टँडर्ड पिस्तूल मिश्र सांघिक ज्युनियर स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. या लढतीत त्यांनी चीनच्या फॅंग सिक्सुआन आणि लियू यांगपान यांच्याविरुद्ध ३-१७ असा पराभव करून चॅम्पियनशिपमधील भारताचे पहिले रौप्य पदक जिंकले.