मुंबईच्या मीरारोडमध्ये गोमांसावरून काल (१८ जून) गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. मीरारोडच्या नयानगरमध्ये ही घटना घडली. या मार्गावरून गोमांसची विक्री होत असल्याची माहिती हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती. माहितीच्या आधारे हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मार्गावरील काही गाड्या अडवून त्याची चौकशी केली. या दरम्यान एका वाहनातून गोमांसची विक्री होत असल्याचे आढळून आहे. यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली.
हिंदू कार्यकर्त्यांनी वाहन अडवून चौकशी केली असता हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. अडविण्यात आलेल्या वाहनचाकाकडे याबाबत चौकशी केली असता सुरवातीला त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली. मात्र, थोड्याच वेळात त्याने कबूल केले की, गाडीमध्ये बैलाचे मांस आहे. चालकाने सांगितले की, गाडीमध्ये गायीचे मांस नाहीये, परंतु बैल आणि म्हशीचे मांस आहे.
हे ही वाचा..
राम मंदिरात तैनात असलेल्या जवानाचा संशयास्पद गोळी लागून मृत्यू!
पत्नीच्या मृत्यूने बसला धक्का, आसामच्या गृहसचिवानं स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या!
कॅनडाच्या संसदेत खलिस्तानी दहशतवाद्याला श्रद्धांजली
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो शोधताहेत भारत संबंधांमध्ये ‘संधी’
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे मांस भिवंडीतून मीरारोडच्या नयानगर परिसरात नेले जात होते. नयानगर हा संपूर्ण मुस्लिम परिसर आहे. जेव्हा हिंदू संघटनानी गोमांस घेऊन जाणाऱ्या ट्रकला अडवले आणि पोलसांनी कारवाईला सुरवात केली तेव्हा यावरून परिसरातील अनेक लोकांनी हंगामा केला. या घटनेवरून परिसरात काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
या संदर्भात माहिती देताना डीसीपी प्रकाश गायकवाड यांनी सांगितले, गोमांसची विक्री होत असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. माहितीच्या आधारे आम्ही कारवाईचे करत एकूण चार वाहने जप्त केली आहेत. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.