अंबानींच्या क्रूझचे टायटॅनिक व्हावे… स्वयंघोषित इतिहासकार रुचिका शर्माची अभद्र भाषा

अनंत अंबानी यांच्या लग्नसोहळ्यावरून केले वादग्रस्त विधान

अंबानींच्या क्रूझचे टायटॅनिक व्हावे… स्वयंघोषित इतिहासकार रुचिका शर्माची अभद्र भाषा

प्रसिध्द उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी हा १२ जुलै रोजी राधिका मर्चंट बरोबर विवाह बंधनात अडकणार आहे. त्याआधी युरोपियन लक्झरी क्रूझ जहाजावर त्यांच्या लग्नाआधीचा चार दिवसांचा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याच्या निमित्तने एका बातमीवर प्रतिक्रिया देताना स्वयंघोषित इतिहासकार रुचिका शर्मा यांनी या क्रुझचे टायटॅनिकसारखेच व्हावे, अशी शापवाणी उच्चारली आहे. शर्मा यांच्या या विधानानंतर समाजातून अत्यंत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

मुकेश अंबानी यांच्या मुलाचा विवाह प्राचीन हिंदू वैदिक परंपरेनुसार वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये होणार आहे. नीता आणि मुकेश अंबानी देखील या आठवड्यात युरोपियन लक्झरी क्रूझ जहाजावर त्यांचा मुलगा आणि सून यांच्यासाठी लग्नाआधीचा चार दिवसांचा भव्य सोहळ्यात सहभागी झाले आहेत. सलमान खान, रणबीर कपूर, आलिया भट्ट, एमएस धोनी, रणवीर सिंग आणि इतर प्रसिद्ध व्यक्ती आणि बॉलीवूड स्टार्स तिथे उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा..

मोदी जिंकले तर न्यायालयात जाऊ…जनआंदोलन उभारू… विरोधी पक्ष, आंदोलनजीवी, पाळीव पत्रकारांची योजना

‘मां तुझे सलाम’ गाणे म्हणता म्हणता माजी सैनिकाने गमावले प्राण

‘मां तुझे सलाम’ गाणे म्हणता म्हणता माजी सैनिकाने गमावले प्राण

प. बंगालमधील जयनगर मतदारसंघातल्या केंद्रातील ईव्हीएम तलावात फेकले

२९ मे रोजी सुरू झालेल्या इटली ते फ्रान्स क्रूझवर अमेरिकन गायक-गीतकार देखील परफॉर्म करत आहेत. या पार्श्वभूमीवर स्वयंघोषित इतिहासकार आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठमधून इतिहासात पीएचडी केल्याचा दावा करणाऱ्या युट्यूबर रुचिका शर्मा यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेल्या एका बातमीवर टिपण्णी केली आहे. त्यांनी या नव जोडप्याला टायटॅनिकसारखेच नशीब मिळावे अशी इच्छा व्यक्त केली. म्हणजे ही टायटॅनिकजी १५ एप्रिल १९१२ रोजी उत्तर अटलांटिक महासागरात अंदाजे २,२२४ लोकांसह बुडाली होती. जेव्हा ती एका हिमखंडाला धडकली त्यात सुमारे १,५०० जणांचा मृत्यू झाला होता. ही इतिहासातील सर्वात प्राणघातक सागरी आपत्ती होती.

या त्यांच्या टिपण्णीवर नेटिझन्सनी या विचित्र मानसिकतेबद्दल निंदा केली आहे. पत्रकार स्वाती चतुर्वेदी यांनी रुचिका शर्माच्या वक्तव्याची तुलना दहशतवाद्यांशी केली. कारण दहशदवादी नेहमी निष्पापांना टार्गेट करत असतात. चतुर्वेदी म्हणतात की, मुकेश अंबानी यांनी पैसे कमावले आहेत आणि ते त्यांच्या इच्छेनुसार वापरण्याचा अधिकार त्यांना आहे. लोकांना सार्वजनिक मृत्यूची शुभेच्छा देणारा घाणेरडा स्नार्क वाईट आहे.

Exit mobile version