आरटीई राखीव जागांवरील प्रवेशाचा उडालाय बोजवारा

आरटीई राखीव जागांवरील प्रवेशाचा उडालाय बोजवारा

सद्यस्थितीला राज्याची शैक्षणिक अवस्था ही अतिशय दयनीय आहे. शिक्षण हक्क कायद्याच्या अंतर्गत आरटीईच्या राखीव जागांच्या प्रवेशामध्येही घोळ घातला गेला आहे. शिक्षण हक्क अधिकार कायद्यानुसार आरटीई अंतर्गत शेकडो जागांवर प्रवेश रखडल्याचे आता समोर आलेले आहे. या प्रवेशासाठी एकूण उपलब्ध जागा ९६ हजार ६८४ इतक्या आहेत. त्यापैकी केवळ २३ हजार ११४ जागांवरच प्रवेश पूर्ण झालेले आहेत. आरटीई अंतर्गत खासगी शाळांमध्ये काही जागा या राखीव ठेवल्या जातात. सद्यस्थितीमध्ये तब्बल ७३ हजार जागा रिक्त असल्याचे आता समोर आले आहे. यामुळेच आता पालकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

हे ही वाचा:

हल्लेखोरासोबत पडळकरांवरही गुन्हा

शिंदे, पालांडे यांची कोठडी ६ जुलैपर्यंत वाढविली

आता बस झाले! दुकानांची वेळ वाढवा!!

दहा हजार गुंड आणण्याचे आदेश मातोश्रीवरून?

राज्यातील ९ हजारांपेक्षा जास्त शाळांमध्ये आरटीई अंतर्गत प्रवेशाच्या जागा उपलब्ध आहेत. यापैकी १ लाखांच्या आसपास यंदा जागा उपलब्ध होत्या. असे असूनही अजूनही या जागा रिक्त आहेत. त्यामुळेच पालकांमध्ये याविषयी तीव्र संताप उमटत आहे. अनेक शाळांनी प्रवेश नाकाल्यामुळे, आता प्रवेशासाठीची मुदतही वाढविण्याचा निर्णय प्राथमिक शिक्षण संचालकांकडून घेण्यात आलेला आहे. या प्रवेशाची पुढची मुदत ही आता ९ जुलैपर्यंत वाढविण्यात आलेली आहे.

शालेय शिक्षण विभागाकडून खासगी शाळांना आरटीई अंतर्गत प्रवेश सक्तीचा केलेला आहे. तरीही अनेक शाळांनी शुल्काच्या नावाखाली प्रवेश नाकारलेले आहेत. शिक्षण विभागाने हा एकूणच विषय गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. अन्यथा आरटीई अंतर्गत प्रवेशप्रक्रीया येत्या काळात होईल की नाही, असाच प्रश्न आता निर्माण झालेला आहे.

Exit mobile version