रेशीमबागेत कोरोनाचा शिरकाव…सरसंघचालकांना झाली लागण

रेशीमबागेत कोरोनाचा शिरकाव…सरसंघचालकांना झाली लागण

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना कोरोनाची लागण झाली आहे. शुक्रवारी दुपारी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल आला असता त्यांना कोविडची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून ते सावधानतेच्या कारणामुळे इस्पितळात भरती झाले आहेत.

भारतात कोरोनाची दुसरी लाट आली असून त्याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसलेला आहे. देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. देशात दर दिवशी होणाऱ्या रुग्णवाढीतही महाराष्ट्र अव्वल आहे. शुक्रवार नऊ एप्रिलची आकडेवारी बघता महाराष्ट्रात ५८,९९३ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत तर ३०१ जणांचा मृत्यू नोंदवण्यात आले आहे. या आकड्यासह महाराष्ट्रातील सक्रिय रुग्णसंख्या ही ५,३४,९०३ इतकी झाली आहे.

हे ही वाचा:

देवभूमीत होणार मंदिरमुक्ती

पवारांना घरपोच सेवेवरून कोर्टाने ‘लस’ टोचली

सरकार कोरोनाबाबत गंभीर नाही

ठाकरे सरकारची परिस्थिती ‘नाचता येईना अंगण वाकडे’

शुक्रवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत हे सुद्धा कोरोनाबाधीत झाले आहेत. कोरोनाची सौम्य लक्षणे आढळून आल्यानंतर सरसंघचालक मोहन भागवत यांनी आपली कोरोना चाचणी करून घेतली होती. शुक्रवारी दुपारी या चाचणीचा अहवाल आला असून यात ते कोविड पॉजिटीव्ह असल्याचे समोर आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असली तरीही खबरदारी म्हणून ते नागपूर येथील किंग्जवे इस्पितळात भरती झाले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे शुक्रवारी रात्री उशिरा ट्विट करत या संदर्भातील माहिती देण्यात आली आहे.

Exit mobile version