पुणे जिल्हा हा देशातील सर्वाधिक कोरोनाबाधीत जिल्ह्यांपैकी एक आहे. पुण्यातील रूग्णांना हाॅस्पिटल आणि कोविड सेंटरमधील बेड्स अपूरे पडत आहेत. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समाजासाठी धावून आला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघच्या जनकल्याण समिती आणि विवेक व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यात कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. या माध्यमातून पुन्हा एकदा आपण समाजासाठी सदैव कटीबद्ध असल्याचे दाखवून दिले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना कायमच समाजाच्या सेवेसाठी तत्पर असते. ‘कठीण समय येता संघ कामास येतो’ या उक्तीला जागत समाजात जिथे गरज असते तिथे संघ सक्रिय असलेला दिसतो. मग कधी नैसर्गिक आपत्तीचा प्रसंग असुदे वा कोरोनासारख्या वैश्विक महामारीचे संकट. गेल्या वर्षभरात कोरोनाच्या संकटात संघाने जमेल तशी समाजाला मदत केल्याचे दिसून आले. त्यात धारावीतील टेस्टींगपासून ते गरजूंना मोफत अन्न पुरवण्यापर्यंत संघ स्वयंसेवक प्रत्येक ठिकाणीच सक्रिय होते.
हे ही वाचा:
कष्टकरी चालले गावाला, पॅकेज मिळणार कुणाला?
पुण्यातील व्यापारी लॉकडाऊन विरुद्ध उच्च न्यायालयात
राज्य सरकारचे पॅकेज की ‘रिपॅकेजिंग’?
योगी आदित्यनाथ यांना कोरोनाची लागण
कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेतही संघाचे हे अविरत कार्य सुरूच आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत देशातील सर्वाधिक रूग्ण महाराष्ट्रात आहेत. पुणे जिल्ह्यातील परिस्थिती अत्यंत बिकट आहे. अशा परिस्थितीत संघाने पुण्यात ४५० खाटांचे कोविड सेंटर सुरू केले आहे. विशेष म्हणजे हे सेंटर निःशुल्क सेवा देणारे असणार आहे. कर्वे महिला वसतिगृह, कर्वेनगर येथे हे कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे असणाऱ्या महिला व पुरुषांकरिता हे सेंटर उपलब्ध असणार आहे.