‘कठीण समय येता संघ कामास येतो’ याची प्रचिती सध्या देशात अनेक ठिकाणी येत आहे. तसाच अनुभाव सध्या नाशिककर घेत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून नाशिकमध्ये कोविड सेंटर सुरु करण्यात आले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, आयुर्वेद सेवा संघ आणि नाशिक महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने हे सेंटर सुरु करण्यात आले आहे.
देशात सध्या कोरोनाचा उद्रेक वाढला आहे. देश या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत होरपळत असताना महाराष्ट्राला त्याची सर्वाधिक झळ बसत आहे. वाढत्या रुग्णसंख्येच्या मानाने आरोग्य व्यवस्था अपुऱ्या पडत आहेत. तर आहे त्या व्यवस्थांवर ताण पडत आहे. अशात अनेक रुग्णांना बेड्स मिळत नाहीयेत. म्हणूनच राज्यात अनेक ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून पुढाकार घेत कोविड सेंटर्स उभारण्यात आले आहेत.
हे ही वाचा:
कमिन्सच्या दातृत्वाने मोदी विरोधकांना पोटशूळ
सौदी अरेबियातील विद्यार्थी गिरवतायंत रामायण, महाभारताचे धडे
फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे काय दिला इशारा?
पप्पूगिरीचे सर्व हक्क काँग्रेसकडे राखीव
रविवार २५ एप्रिल पासून नाशिक मध्ये असेच एक कोविड सेंटर सुरु करण्यात आले आहे. राष्ट्रे स्वयंसेवक संघ, आयुर्वेद सेवा संघ आणि नाशिक मनपाच्या संयुक्त विद्यमाने सुरु करण्यात आलेल्या या सेंटरचे उदघाटन रविवारी झाले. नाशिक जिल्ह्याचे संघचालक विजयराव कदम आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे स्वामी आनंद यांच्या हस्ते भारतमाता पूजन करून हे उदघाटन पार पडले. या कोविद सेंटरची क्षमता ५० खाटांची आहे. नाशिक येथील रॉयल हेरिटेज हॉटेल या ठिकाणी हे सेंटर सुरु करण्यात आले आहे. या सेंटरमुळे नाशिकच्या आरोग्यव्यवस्थेवर येणार ताण कमी होण्यास मदत होणार आहे.