थोर स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज जयंती देशभरात साजरी होत आहे. यानिमित्त पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कोलकातामध्ये एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या अभिवादन कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांनी मार्गदर्शन केले. सरसंघचालक भागवत म्हणाले, नेताजींची स्वप्ने अजून पूर्ण झालेली नाहीत. आपण मिळून ते पूर्ण केली पाहिजे. नेताजी सुभाषचंद्र बोस आणि आपल्या पूर्वजांनी दाखवलेल्या मार्गाने आपण या जगात शांतता आणि बंधुता पसरवू शकतो. आज संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे लागले आहे.
कोलकाता येथील शहीद मिनार मैदानावर संघाच्या प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. भागवत पुढे म्हणाले की नेताजींनी आपले संपूर्ण आयुष्य देशासाठी समर्पित केले. नेताजींचे आयुष्य जवळजवळ वनवासात राहण्यासारखे होते. त्यांनी आपले बहुतेक आयुष्य वनवासात घालवले. देशासाठी त्यांनी आपले सर्वस्व अर्पण केले.
हे ही वाचा:
पाकिस्तानचे डोळे उघडले? म्हणतात, भारताशी तीन युद्धे केल्यामुळे झालो गरीब
जोशीमठमधील हॉटेलनंतर आता घरे पाडण्याचा निर्णय
पाकिस्तानात १३ वर्षांच्या हिंदू मुलींना पळवून होत आहेत विवाह, धर्मांतरण
महाराष्ट्राला मिळाली भरभक्कम गुंतवणूक
संघाच्या दक्षिण बंगाल प्रांताचे प्रचार प्रमुख बिप्लव रॉय यांनी सांगितले की कोलकाता आणि हावडा महानगरातून या कार्यक्रमात १५,००० पेक्षा जास्त स्वयंसेवक सहभागी झाले आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत शहीद मिनार मैदानावर उपस्थित १५,००० पेक्षा जास्त स्वयंसेवकांनी पथसंचलन, उद्घोषणा, कदमताल, आणि दंड प्रहार याची प्रात्यक्षिके दाखवली .