राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसहकार्य सहसरकार्यवाह मनमोहन वैद्य यांनी संघाच्या एका कार्यक्रमात सांगितले की, कोविड-१९ महामारीच्या काळात संघाने ७३ लाख लोकांपर्यंत रेशन पाकिटे आणि ४५ लाख लोकांपर्यंत अन्नधान्याची पाकिटे पोहोचवण्याचे काम केले आहे.
मनमोहन वैद्य यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत (एबीपीएस) बोलताना ही माहिती दिली आहे. ही सभा बंगळूरू येथील चेन्नेनाहळ्ळी येथे आयोजित केली होती.
या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघसंचालक मोहन भागवत, सहसरकार्यवाह मनमोहन वैद्य आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे इतर नेते देखील उपस्थित होते.
हे ही वाचा:
महावितरणाच्या अजब कारभारामुळे पुणे जम्बो कोविड सेंटरमधील बत्ती गुल
मनसुख हिरेन हत्या प्रकरणात एटीएसचा मोठा दावा
एनआयएच्या ताब्यातील गाड्यांच्या फॉरेन्सिक तपासणीला सुरूवात
यावेळी बोलताना वैद्या म्हणाले, “कोरोना काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ७५ लाख लोकांना रेशन पाकिटे पुरवली तर ४५ लाख लोकांना अन्नधान्याची पाकिटे दिली. देशभरातील सुमारे ६० टक्के मंडलांत आपले काम झाले.”
“याकाळात ९० लाख मास्कचे वितरण करण्यात आले आणि आपल्या कार्यकर्त्यांनी ६०,००० पेक्षा जास्त युनिट रक्तदान देखील केले. याकाळात स्वयंसेवकांनी २० लाखांपेक्षा जास्त स्थलांतरित कामगारांची आणि २.५ लाख भटक्या लोकांची मदत केली.” असेही वैद्य यांनी सांगितले.
“प्रत्येक जण कदाचित संघात येऊ शकत नाही, परंतु त्यांना संघासोबत काम करण्याची उत्सुकता आहे. आम्ही बैठकांमध्ये शाखा अजून कशा वाढवता येतील आणि त्यांची भूमिका देखील कशी सुनिश्चित करता येईल याचा विचार करू.” असे सांगितले. यावेळी वैद्य यांनी लोकांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल कुतुहल वाढत असल्याचे देखील नमुद केले आहे.