देशभरात आज ७४ वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे , राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत जयपूरमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात सहभागी झाले . जामडोली येथील केशव विद्यापीठाच्या स्टेडियमवर झालेल्या कार्यक्रमात सरसंघचालकांनी प्रमुख पाहुणे म्हणून तिरंगा फडकावला. आपल्या भाषणात भागवत म्हणाले की, भारतात ज्ञानाची परंपरा आहे, जे खऱ्या मनाने पुढे जातात ते प्रत्येकाला आपले मानतात आणि मन कोणाशीही वैर करत नाही.
जयपुर (राजस्थान): आरएसएस प्रमुख मोहन भागवत ने जामडोली के केशव विद्यापीठ में 74वें गणतंत्र दिवस समारोह में हिस्सा लिया। pic.twitter.com/LqPDSTmxFK
— ANI_HindiNews (@AHindinews) January 26, 2023
आपल्या देशाच्या तिरंग्यात प्रत्येक रंगाचे स्वतःचे महत्त्व आहे, जेथे पांढरा रंग पवित्रतेचे प्रतीक आहे कारण येथील लोक कोणाचाही द्वेष करत नाहीत. तिरंग्यातील हिरवा रंग समृद्धी आणि लक्ष्मीजींचे प्रतीक आहे असे भागवत यांनी सांगितले. सरसंघचालक पुढे म्हणाले की , आपल्याला आपल्या स्वातंत्र्याची काळजी घ्यावी लागते आणि जगाचा अनुभव असा आहे की जिथे स्वातंत्र्य असते तिथे नेहमीच समानता नसते, आपण आपापसात बंधुभाव आणला पाहिजे जेणेकरून स्वातंत्र्य खऱ्या अर्थाने साकार होईल आणि स्वातंत्र्याचे स्वप्न पूर्ण होईल. समानता पूर्ण होईल.
हे ही वाचा:
मला तुरुंगात टाकण्याचे टार्गेट दिले होते, पण…फडणवीस काय म्हणाले?
उद्धव ठाकरे यांचे भाषण म्हणजे भागम भागचा तिसरा भाग
सरसंघचालक बुधवारी रात्री जयपूर येथे पाच दिवसांच्या मुक्कामावर पोहोचले. येथे २९ जानेवारीपर्यंत पाच दिवस त्यांचा राजस्थानमध्ये मुक्काम असेल . मोहन भागवत दोन वर्षातून एकदा एकदा प्रत्येक प्रांतात मुक्काम करतात. शताब्दी वर्षात रास्वसंघने कोणकोणतं बदल घडवून आणला याचा आढावा ते घहेत आहेत. संघाच्या १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या कार्यक्रमाच्या तयारीबाबत एक बैठक होणार आहे.