बंगळुरूच्या रामेश्वरम कॅफेमध्ये स्फोट घडवून आणणाऱ्या व्यक्तीवर एनआयएने १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.बॉम्बरची माहिती देणाऱ्याला एनआयएकडून १० लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.तसेच माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवली जाणार असल्याचे एजन्सीने एका निवेदनात म्हटले आहे.
१ मार्च रोजी लंच दरम्यान बंगळुरुच्या या प्रसिद्ध कॅफेमध्ये स्फोट झाला होता. या स्फोटात १० जण गंभीर जखमी झाले.याप्रकरणी केंद्रीय गुन्हे शाखा आणि एनआयए दोन्ही तपासात गुंतले आहेत. मंगळवारी गृह मंत्रालयाच्या आदेशानंतर एनआयएने (NIA) या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारली आहे.मात्र,या घटनेत अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
हे ही वाचा :
पंतप्रधानांची दक्षिण मोहीम; भाजपला ३० जागा मिळण्याची शक्यता
मलाही मुसेवाला-नफेसिंगप्रमाणे मारतील!
ममता बॅनर्जींना संदेशखालीतील घटनेचा काहीही फरक पडत नाही!
NIA announces cash reward of 10 lakh rupees for information about bomber in Rameshwaram Cafe blast case of Bengaluru. Informants identity will be kept confidential. pic.twitter.com/F4kYophJFt
— NIA India (@NIA_India) March 6, 2024
दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्फोटाच्या तासाभरापूर्वी एक संशयित तरुण कॅफेमध्ये आल्याचे समोर आले.तो संशयित तरुण काही मिनिटे थांबतो आणि नंतर एक बॅग ठेवून निघून जातो.त्या बॅगेत आयईडी असल्याचे समजते.आरोपीने कॅफेमध्ये इडलीची प्लेट मागवली होती, पण प्लेट तयार होण्यापूर्वीच तो निघून जाताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे एजन्सीने त्याचे स्केच तयार केले असून त्याचे पोस्टर प्रसिद्ध करण्यात आले आहे.कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, बॉम्बरचे वय २८ ते ३० वर्षे आहे.
एनआयएने हे प्रकरण हाती घेताच शोध मोहिमेला गती मिळाली आहे.संशयित आरोपीचे स्केच ठिकाणी-ठिकाणी लावण्यात आले असून त्याचा शोध तपास यंत्रणा करत आहेत.आरोपीची माहिती देणाऱ्यास १० लाख रुपयांचे बक्षीस एजन्सीकडून जाहीर करण्यात आले आहे.याशिवाय माहिती देणाऱ्याची ओळख उघड करणार नसल्याचे एजन्सीने सांगितले आहे.