आर आर आर चित्रपटाची टीम पोहोचली स्टॅच्यू ऑफ युनिटीला

आर आर आर चित्रपटाची टीम पोहोचली स्टॅच्यू ऑफ युनिटीला

बाहुबली आणि बाहुबली २ या चित्रपटांचे दिग्दर्शक राजामौली हे आता आपला नवा चित्रपट घेऊन येत आहेत. राईज, रोअर, रिवोल्ट अर्थात आर आर आर हा चित्रपट या महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. २५ मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत असून या चित्रपटाची देशभर चांगलीच चर्चा आहे. आज या चित्रपटाच्या टीमने गुजरात येथील स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट दिली आहे.

आर आर आर चित्रपटाचे दिग्दर्शक राजामौली यांच्या समवेत चित्रपटाचे दोन्ही नायक राम चरण आणि एनटीआर ज्युनीयर यांच्या सोबत गुजरात येथील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला भेट दिली. हा जगातील सर्वात उंच असा पुतळा आहे. चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने आर आर आर चित्रपटाचा चमू सध्या गुजरात दौऱ्यावर आहे. या दौऱ्याचा एक भाग म्हणूनच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ते स्टॅच्यू ऑफ युनिटी या ठिकाणी गेले आहेत.

हे ही वाचा:

अगदी लवकर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिसणार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या मुलावर फसवणुकीचा गुन्हा

अगदी लवकर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिसणार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात

जोझिला पास (रस्ता) पुन्हा वाहतुकीसाठी खुला! BRO ची ऐतिहासिक कामगिरी

या चित्रपटातील ‘शोले शोले’ हे गाणे सध्या प्रचंड लोकप्रिय ठरत आहे. या गाण्यात देशभरातील विविध क्रांतिकारकांच्या आणि महापुरुषांच्या प्रतिमा दाखवण्यात आल्या आहेत. स्वातंत्र्याचा झेंडा या कल्पने भोवती हे गाणे गुंफण्यात आले आहे. या गाण्यात देखील लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचीही प्रतिमा दिसते. त्यामुळेच वल्लभभाई पटेल यांच्या या जागतील सर्वात मोठ्या पुतळ्याला आर आर आर चित्रपटाच्या टीमने भेट दिली आहे.

शुक्रवार, २५ मार्च रोजी आर आर आर हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील घटना या चित्रपटात दाखवण्यात आल्या आहेत. या चित्रपटात स्वातंत्र्याचा संग्राम दाखवण्यात आला आहे. या चित्रपटात एनटीआर ज्युनिअर, राम चरण, आलिया भट, अजय देवगण यांच्या मुख्य भूमिका आहेत.

Exit mobile version