पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘रोजगार मेळा’ कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग घेतला. यादरम्यान पंतप्रधान मोदींनी कर्मयोगी स्टार्ट मॉड्यूल – नोकरी मेळाव्यात सर्व नवीन नियुक्त्यांसाठी ऑनलाइन ओरिएंटेशन कोर्स सुरू केला. पंतप्रधान मोदींनी रोजगार मेळाव्यात ७१ हजार ५६ नियुक्तीपत्रांचे वाटप केले आहे. देशातील जास्तीत जास्त युवाशक्तीचा राष्ट्र उभारणीत वापर व्हावा, ही आमच्या सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे. तज्ज्ञ सांगत आहेत की भारताला आपली क्षमता दाखवण्याची सुवर्णसंधी आहे आणि त्यामुळे उत्पादन क्षेत्रातही भारत अव्वल ठरणार असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून देशातील तरुणांना नियुक्तीपत्र देण्याची ही मोहीम अशीच सुरू राहील. भारतासारख्या तरुण देशात आपले कोट्यावधी युवक ही या देशाची सर्वात मोठी ताकद आहे. केंद्र सरकार आपल्या तरुणांच्या प्रतिभा आणि उर्जेला सर्वोच्च प्राधान्य देत आहे. ज्याचा राष्ट्र उभारणीत जास्तीत जास्त वापर केला गेला पाहिजे, असं यावेळी मोदींनी नमूद केले आहे.
जूनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रातील सर्व मंत्रालये आणि विभागांना या दिशेने काम करण्याचे निर्देश दिले होते. दिवाळीनिमित्त आयोजित रोजगार मेळाव्यात देशभरातून निवडक तरुणांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. आता पुन्हा एकदा रोजगार मेळाव्यात ७१ हजार ५६ नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आले आहे.
सरकारी आणि गैर-सरकारी क्षेत्रात नोकऱ्यांच्या अफाट शक्यता निर्माण केल्या जात आहेत. या संधी तरुणांसाठी त्यांच्या गावात आणि शहरांमध्ये निर्माण केल्या जात आहेत. आमचे ८० हजार स्टार्ट-अप तरुणांना त्यांच्या कलागुणांचे प्रदर्शन करण्याची संधी देत आहेत.
हे ही वाचा :
श्रद्धा हत्या प्रकरण उघडकीस आल्यापासून आफताबचे कुटुंब गायब
‘पुन्हा सत्तेत येण्यासाठी पदयात्रा काढत आहेत’
हिजाबविरोधाच्या समर्थनार्थ इराण फुटबॉल संघाने टाळले राष्ट्रगीत
कतारमधील फुटबॉल वर्ल्डकपमध्ये वादग्रस्त झाकीर नाईक करणार इस्लामचा प्रचार
या शहरांतील तरुणांना नियुक्तीपत्रे मिळाली
रायपूर, नवी दिल्ली, पणजी, गुरुग्राम, पोर्ट ब्लेअर, विशाखापट्टणम, इटानगर, गुवाहाटी, पाटणा, श्रीनगर, उधमपूर, जम्मू, रांची, हजारीबाग, बंगलोर, तिरुवनंतपुरम, लेह, भोपाळ, ग्वाल्हेर, इंदूर, पुणे, नागपूर, इंफाळ, शिलाँग आयझॉल, दिमापूर, भुवनेश्वर आणि जालंधर इत्यादी ४५ शहरांतील तरुणांना नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत.