रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सचा अंतिम फेरीत पराभव करून विमेन प्रिमिअर लीग २०२४ कपवर नाव कोरून १६ वर्षांचा दुष्काळ संपवला. नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडिअमवर शनिवारी रंगलेल्या सामन्यात बेंगळुरूने दिल्लीचा आठ विकेटने पराभव केला.
दिल्लीने ठेवलेले ११४ धावांचे लक्ष्य बेंगळुरूने सहजच गाठले आणि पहिल्यांदाच चषकावर नाव कोरले. सोफी मोलिन्युक्स आणि श्रेयांका पाटील या फिरकीपटूंनी दिल्लीच्या संघाचे कंबरडे मोडले. दिल्लीचा संघ ६४वर नाबाद असताना मोलिन्युक्सने एका षटकात तीन विकेट घेतल्या. धोकादायक असणाऱ्या शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज आणि एलिस कॅप्सी यांना तिने एकाच षटकात माघारी पाठवले. तिला साथ मिळाली ती श्रेयांकाची. तिने चार विकेट घेतल्याने दिल्लीला अवघ्या ११३ धावा करता आल्या. त्यानंतर बेंगळुरूच्या स्मृती मंधाना, सोफी डिव्हाइन आणि एलिस पेरीने हे लक्ष्य सहज गाठून चषकावर नाव कोरले.
आठ सामन्यांत १३ विकेट घेणाऱ्या श्रेयांका हिने मोलिन्युक्स आणि आशा शोभना यांना मागे टाकून पर्पल कॅप मिळवली तर, सर्वाधिक धावा करून पेरीने मेग लॅनिंग हिला मागे टाकत ऑरेंज कॅपचा मान मिळवला.
दिल्लीच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लॅनिंग आणि शेफालीने सुरुवातीला चांगली सुरुवात करून दिली. शेफाली ही विमेन प्रिमिअर लीगमध्ये अर्धशतक ठोकणारी भारतीय महिला ठरेल, या दिशेने तिची वाटचाल सुरू होती. तिने रेणुका सिंह हिच्या एका षटकात तब्बल १९ धावा ठोकून काढल्या. त्यातील २७ चेंडूंमध्ये ४४ धावा केल्या. त्यात दोन चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. मात्र मोलिन्युक्स हिने शेफाली, जेमिमा आणि कॅपसी यांना बाद केले आणि दिल्लीचा संघ ढेपाळला. त्यामुळे नाबाद ६४वरून दिल्लीची तीन बाद ६५ अशी अवस्था झाली.
त्यानंतर श्रेयांकाने ११व्या षटकांत लॅनिंगला बाद केले. तेव्हा दिल्लीची चार बाद ७४ अशी अवस्था होती. नंतर आशाने मॅरिझेन कॅप आणि जेस जोनासन यांना बाद केले. तेव्हा दिल्लीची अवस्था सहा बाद ८१ अशी झाली. त्यानंतर मोलिन्युक्सने राधा यादव हिला बाद केले, तेव्हा दिल्लीची धावसंख्या सात बाद ८७ होती. मिन्नू राणी आणि अरुंधती रॉय यांनी कसेबसे दिल्लीला १०० धावसंख्येपर्यंत आणले. मात्र हे प्रयत्न अपुरे ठरले. श्रेयांकाने मणीला बाद करून दुसरी विकेट घेतली. त्यामुळे दिल्लीचा संघ ११३ धावांत आटोपला.
हे ही वाचा:
रशियाच्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत ८८ टक्के मते मिळवून पुतिन विजयी
उद्धव ठाकरेंना गुडबाय; आमदार आमशा पाडवी एकनाथ शिंदेकडे!
यूट्यूबर एल्विश यादवला नोएडा पोलिसांनी केली अटक!
हत्या झालेला पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाच्या आईने लहान मुलाला दिला जन्म!
श्रेयांका ही बेंगळुरूची सर्वाधिक महत्त्वाची गोलंदाज ठरली. तिने ३.३ षटकांत अवघ्या १२ धावा देऊन चार विकेट पटकावल्या. तर, मोलिन्युक्स हिने तीन महत्त्वाच्या विकेट घेतल्या. तर, दिल्लीच्या मंधाना आणि सोफी डिव्हाइन यांनी ४९ धावांची सलामीची खेळी केली. मात्र नवव्या षटकात डिव्हाइन ३२चेंडूंत २७ धावा करून बाद झाली. त्यानंतर पेरीने मंधानाला समर्थपणे साथ दिली. बेंगळुरूला विजयासाठी ४८ चेंडूंत ५३ धावा हव्या होत्या. लॅनिंगने शिखाचा पुरेपूर वापर करून तिची दमछाक केली होती. तिने डिव्हाइनची विकेट घेऊन चार षटकांत केवळ ११ धावा दिल्या. मात्र पेरी आणि रिचा घोष यांनी संयतपणे खेळी करून दिल्लीवर आठ विकेट राखून विजय मिळवला.