आयपीएल २०२४ चा हंगाम रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूसाठी आतापर्यंत खूप खराब गेला आहे. या स्पर्धेत आरसीबीला गेल्या सलग ४ सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. आरसीबी गुणतालिकेत १० व्या क्रमांकावर आहेत. आता प्रश्न उपस्थित होत आहे की आरसीबी दहाव्या स्थानावर असूनही प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकेल का? चला तर मग जाणून घेऊया आरसीबी अजूनही प्लेऑफसाठी कशी पात्र ठरू शकते.
दिल्ली आणि लखनऊ यांच्यात झालेल्या सामन्यापूर्वी आरसीबी नवव्या क्रमांकावर होती. परंतु, लखनऊ विरुद्धच्या दिल्लीच्या विजयानंतर बेंगळुरू नवव्या स्थानावरून दहाव्या स्थानावर घसरला. मात्र, प्लेऑफबाबत आत्ताच काहीही सांगता येणार नाही. या संघाने मोसमात सहा सामने खेळले आहेत, ज्यात त्यांना केवळ १ सामना जिंकता आला आहे.
आरसीबी प्लेऑफसाठी पात्र कशी ठरू शकते?
आरसीबीला अजून ८ सामने खेळायचे आहेत. उर्वरित सर्व ८ सामने संघाने जिंकले तर त्यांचे १८ गुण होतील. जे प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी पुरेसे असतील. गेल्या मोसमात चार संघ अनुक्रमे २०, १७, १७ आणि १६ गुणांसह पात्र ठरले होते. अशा परिस्थितीत आरसीबीला प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याची पूर्ण संधी आहे. आता संघ पात्र ठरू शकतो की हा येणारा काळच ठरवेल.
हे ही वाचा:
महायुतीच्या संकल्प मेळाव्यास कांदिवली पूर्वमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद
ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरात गोळीबार; चार जण ठार
बंगळूरू कॅफे ब्लास्टमागील आरोपींना १० दिवसांची पोलीस कोठडी
“निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा असला तरी नरेंद्र मोदी नसते तर राम मंदिर पूर्ण झाले नसते”
२००९ आणि २०११ मध्येही अशीच परिस्थिती
२००९ आणि २०११ मध्ये आरसीबीची हीच अवस्था होती. जिथे त्यांनी सलग चार सामने गमावले होते. पण तरीही हा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरला. या संघाने दोन्ही मोसमात केवळ प्लेऑफमध्येच प्रवेश केला नाही तर अंतिम फेरीही गाठली. मात्र, दोन्ही वेळा संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. २००९ च्या अंतिम सामन्यात डेक्कन चार्जर्सने बेंगळुरूला पराभूत केले होते. त्यानंतर २०११ मध्ये चेन्नई सुपर किंग्जने त्यांना अंतिम फेरीत पराभूत करून ट्रॉफी जिंकण्यापासून रोखले होते.