मंदिरात लावलेल्या लाऊडस्पीकरबाबत एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या वक्तव्यावरून मध्य प्रदेशात वाद वाढला आहे. आयएएस अधिकारी शैलबाला मार्टिन यांनी सोशल मिडीयावर लाऊडस्पीकरवर प्रश्न उपस्थित केले आणि त्यामुळे ध्वनीप्रदूषण होत असल्याचे लिहिले. अधिकाऱ्याच्या ट्वीटवरून नव्या वादाला तोंड फोडले असून हिंदू संघटनांनी याचा निषेध केला आहे.
गेल्या आठवड्यात दुर्गा मूर्तीच्या विसर्जनाच्या वेळी लाऊडस्पीकरवरून डीजे संगीतावर नाचत असताना १३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्यानंतर सोशल मीडियावर झालेल्या चर्चेदरम्यान आयएएस अधिकाऱ्याने ही टिप्पणी केली. शैलबाला मार्टिन सध्या सामान्य प्रशासन विभागात अतिरिक्त सचिव म्हणून कार्यरत आहेत. एका पत्रकाराने सोशल मिडीयावर लाऊडस्पीकरवरून कायद्यातील असमानतेवर प्रश्न उपस्थित केले होते.
या पोस्टला उत्तर देताना आयएएस अधिकारी शैलबाला मार्टिन म्हणाल्या, मंदिरांमधील लाऊडस्पीकरमुळे होणारे ध्वनी प्रदूषण, जे अनेक रस्त्यांवर ऐकू येते आणि रात्री उशिरापर्यंत सुरू असते, याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते, असे आयएएस अधिकारी म्हणाल्या. अधिकाऱ्याच्या ट्विटमुळे सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पूर आला, काही वापरकर्त्यांनी त्यांच्या भूमिकेचे समर्थन केले तर काहींनी हा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल त्यांच्यावर टीका केली.
हे ही वाचा :
बैरुतमध्ये रुग्णालयाखाली असलेल्या नसरल्लाच्या बंकरमध्ये कोट्यवधीची माया
कामगारांच्या हत्येप्रकरणी जम्मू काश्मिरात ‘लष्कर’ची शाखा छाटण्याची कारवाई सुरू!
रशियन सैन्यात सहभागी असलेल्या ८५ भारतीयांची सुटका
पुतीन यांच्याशी मोदींची पुन्हा भेट; रशियाच्या दौऱ्यावर रवाना
‘संस्कृती बचाओ मंच’च्या संघटनेन यावर आक्षेप घेत अधिकारी शैलबाला मार्टिन यांच्या विरोधात आंदोलन करणार असल्याचे सांगितले, तसेच त्यांना हिंदूंच्या भावना दुखावण्याचा अधिकार नसल्याचेही संघटनेने सांगितले.
“जर कोणी हिंदूंच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न केला, तर संस्कृती बचाव मंच त्याला विरोध करेल. अजान सारख्या लाऊडस्पीकरवर दिवसातून पाच वेळा मंदिरांमध्ये आरती आणि मंत्र उच्चारले जात नाहीत. शैलबाला मार्टिन यांना माझा प्रश्न आहे की, मोहरमच्या मिरवणुकीवर केव्हा दगडफेक केलेली पहिली आहे का?, मात्र हिंदूंच्या मिरवणुकांवर दगडफेक केली जात आहे, असे संघटनेचे प्रमुख चंद्रशेखर तिवारी म्हणाले.
और मंदिरों पर लगे लाउडस्पीकर, जो कई कई गलियों में दूर तक स्पीकर्स के माध्यम से ध्वनि प्रदूषण फैलाते हैं, जो आधी आधी रात तक बजते हैं उनसे किसी को डिस्टरबेंस नहीं होता🤔 https://t.co/rQ8axYQkre
— Shailbala Martin (@MartinShailbala) October 20, 2024