भारताचे चांद्रयान-३ बुधवारी चंद्रावर यशस्वीपणे उतरल्यामुळे एका ऐतिहासिक क्षणाची नोंद झाली आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ अंतराळयान उतरवणारा भारत हा एकमेव देश ठरला, तर चंद्रावर यशस्वीपणे उतरणारा चौथा देश ठरला. प्रज्ञान रोव्हर विक्रम लँडरमधून चंद्रावर उतरवण्यात आले. गुरुवारपासून त्याने चंद्राच्या पृष्ठभागावर खडकांची तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. प्रज्ञान रोव्हर हा कॅमेरे, स्पेक्ट्रोमीटर आणि वैज्ञानिक तपासणीसाठी उपयुक्त असणाऱ्या ड्रिलसह अनेक उपकरणांनी सुसज्ज आहे.
चांद्रयान-3 चा कालावधी काय आहे?
प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लँडर हे चंद्राच्या पृष्ठभागाचा एकाच चंद्र दिवसासाठी अभ्यास करतील. एक चांद्रदिवस म्हणजे पृथ्वीवरील १४ दिवसांच्या समतुल्य असतो. सध्याचा चंद्र दिवस २३ ऑगस्ट रोजी सुरू झाला. या काळात रोव्हर आणि लँडरवरील वैज्ञानिक उपकरणे चंद्राच्या भूगर्भशास्त्राचा अभ्यास करतील, चंद्रावरील संभाव्य जलस्रोतांचे मूल्यांकन करतील आणि भविष्यातील मानवी शोधासाठी त्याच्या योग्यतेचे मूल्यांकन करतील.
१४ दिवसांनंतर काय होईल?
दोन्ही रोव्हर आणि लँडर सौरऊर्जेवर चालणारे आहेत. १४ पृथ्वी दिवसांनंतर, चंद्राचा दिवस संपतो. त्यापुढील १४ ते १५ दिवस चंद्रावर रात्र असेल. तेव्हा तेथील तापमान उणे १८० अंश सेल्सिअसपर्यंत घसरेल. परिणामी, विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या वातावरणात काम करू शकणार नाहीत.
अन्वेषण पुन्हा सुरू होईल का?
शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, मोहिमेला ही कालमर्यादा ओलांडणे आणि पुन्हा एकदा सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यावर ते पुन्हा सक्रिय करणे शक्य आहे. जर प्रणाली पुढील चंद्र दिवसापर्यंत टिकून राहिल्यास, इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी सुचविल्याप्रमाणे रोव्हर संभाव्यपणे त्याचे अन्वेषण पुन्हा सुरू करू शकेल. तथापि, चंद्रावरील रात्र संपल्यानंतर आणि इस्रोच्या शास्त्रज्ञांकडून लँडर आणि रोव्हरची यंत्रणा तपासल्यानंतरच हे कळू शकणार आहे.
हे ही वाचा:
शरद पवार, सुप्रिया सुळे लवकरच मोदी सरकारला पाठिंबा देतील
मोदी-शी जिनपिंग ब्रिक्स परिषदेत एकमेकांना भेटले
‘अकेला देवेंद्र’ने काय करून दाखवले बघितले ना?
भेसळीसाठी साठविलेला २ कोटी २४ लाखाचा लवंग कांडीचा साठा जप्त
चांद्रयान-३ चा अभ्यास काय आहे?
विक्रम लँडरकडे भूप्रदेश मॅपिंग कॅमेरा आहे, जो येथील थ्रीडी नकाशा तयार करेल. तसेच, लेझर रेट्रो-रिफ्लेक्टर अॅरे चंद्र आणि पृथ्वीमधील अंतर मोजण्यासाठी पृथ्वीवरील लेझर किरणांना परावर्तित करेल. लूनार एक्सप्लोरेशन रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागाची तपासणी करेल आणि वैज्ञानिक प्रयोग करेल. ऑर्बिटर हाय-रिझोल्यूशन कॅमेरा चंद्राच्या पृष्ठभागाच्या हाय-रिझोल्यूशन प्रतिमा कैद करेल. ‘मून इम्पॅक्ट प्रोब’ चंद्राच्या पृष्ठभागाशी टक्कर देईल. चंद्राच्या पृष्ठभागावर एक खड्डा तयार करेल. रोव्हरचे उपकरण ‘अल्फा पार्टिकल एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर’ चंद्राच्या मातीमध्ये उपस्थित रासायनिक घटक ओळखेल. ‘पॅनोरामिक कॅमेरा’ (पॅनकॅम) रोव्हरच्या सभोवतालच्या विहंगम प्रतिमा कैद करेल. ‘लेझर इंड्युस्ड ब्रेकडाउन स्पेक्ट्रोस्कोपी’ चंद्राच्या पृष्ठभागावर लेझर निर्देशित केल्यावर उत्सर्जित होणाऱ्या प्रकाशाचा अभ्यास करून त्याच्या रासायनिक रचनेचे विश्लेषण करेल.
प्रग्यान किंवा विक्रम पृथ्वीवर परततील का?
चांद्रयान-३ पृथ्वीवर परतण्यासाठी तयार केलेले नाही. एकदा शोधकार्य पूर्ण झाल्यावर ही उपकरणे चंद्रावरच सोडून दिली जातील.