युरो कप: शनिवारपासून सुरु होणार ‘राऊंड ऑफ १६’ चे धुमशान

युरो कप: शनिवारपासून सुरु होणार ‘राऊंड ऑफ १६’ चे धुमशान

बुधवारी युरो कप फुटबॉल स्पर्धेत पार पडलेल्या सामन्यांनंतर स्पर्धेतील सर्वोत्तम १६ संघ निवडले गेले आहेत. शनिवार पासून आता या १६ संघांचे पुढचे सामने सुरु होणार आहेत. स्पर्धेची ही पुढची फेरी ही नॉकआऊट पद्धतीची असणार आहे, म्हणजेच पराभूत होणारा संघ हा स्पर्धेतून बाहेर फेकला जाणार आहे.

युरो कप फुटबॉल स्पर्धेच्या ग्रुप स्टेजचे सामने बुधवारी संपले आणि स्पर्धेतील सर्वोत्तम १६ संघ निवडले गेले. स्पर्धेला पात्र ठरलेल्या २४ संघांमधून हे १६ संघ निवडले गेले आहेत. स्पर्धेच्या ग्रुप स्टेजमधील सामन्यांच्या निकालांच्या जोरावर हे सर्वोत्तम १६ संघ निवडले गेले आहेत. यामध्ये सहा ग्रुप्समध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यांच्या आधारे गुणतालिकेत पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर असलेल्या १२ संघाची निवाड तर झालीच, पण तिसऱ्या स्थानावर असणाऱ्या चार संघांचीही निवड करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

नवी मुंबई विमानतळ, भूमिपुत्रांचे घेराव आंदोलन सुरु

ठाकरे सरकारमध्ये ओबीसी मंत्र्यांचं माकड झालंय

कोरोना रुग्णसंख्येत किंचित वाढ

ऑनलाईन अध्यापनासाठी गुगलला अधिक पसंती

या १६ संघांमध्ये वेल्स, डेन्मार्क, इटली, ऑस्ट्रिया, चेक रिपब्लिक, नेदरलँड्स, बेल्जीयम, पोर्तुगाल, क्रोएशिया, स्पेन, फ्रान्स, स्वित्झर्लंड, इंग्लंड, जर्मनी, स्विडन आणि युक्रेन या संघांचा समावेश आहे. शनिवारपासून या १६ संघांच्या सामन्यांना सुरवात होणार असून शनिवार, २६ जून रोजी रात्री ९.३० वाजता वेल्स विरुद्ध डेन्मार्क हा सामना सांगणार आहे. तर रात्री १२.३० वाजता इटली आणि ऑस्ट्रिया हे दोन संघ आपसांत भिडतील. या फेरीमध्ये पोर्तुगाल विरुद्ध बेल्जीयम आणि इंग्लंड विरुद्ध जर्मनी या दोन सामन्यांकडे फुटबॉल चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत.

Exit mobile version