24.5 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरविशेषभुकेलेल्यांसाठी सुरू केलेला रोटी बॅंकेसारखा उपक्रम अभिमानस्पद!

भुकेलेल्यांसाठी सुरू केलेला रोटी बॅंकेसारखा उपक्रम अभिमानस्पद!

आमदार अतुल भातखळकरांच्या समाजोपयोगी उपक्रमाबद्दल खासदार गोपाळ शेट्टी यांनी काढले गौरवोद्गार

Google News Follow

Related

कांदिवली पूर्व विधानसभेतील गोरगरीब बांधवांना अन्न मिळावे यासाठी भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी एक मानवतावादी उपक्रम सुरू केला आहे.धर्मात अन्नदानाचे महत्व नेहमीच अधिक मानण्यात आले आहे. विशेषतः तीर्थक्षेत्री अन्नदान केल्याने महत्पुण्य लाभते अशी भावना आहे. या भावनेने प्रेरित होऊन भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी ‘रोटी बँक’ या नावाने नवीन उपक्रम आपल्या कांदिवली विभागात करण्यात आला. खासदार गोपाळ शेट्टी यांच्या उपस्थितीत या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले तेव्हा त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

ते  भाषणात म्हणाले ,मी अनेक उपक्रम राबविले मात्र अतुलजींच्या रोटी बँक सारख्या उपक्रमाचे उदघाटन मी पहिल्यांदा करत आहे, त्याचा अभिमान वाटतो. गोपाळ शेट्टी यांनी रोटी बँक उपक्रमाचे उद्घाटन केल्यावर भाषण करताना सांगितले की, तळागाळातील लोकांची सेवा करण्याचे काम रोटी बँकेच्या माध्यमातून होईल. ज्यांच्याकडे जेवण शिल्लक राहते ते चांगले जेवण एकत्र करून इथे रोटी बँकमध्ये आणता येईल.

ते पुढे म्हणाले की, इतक्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन मी प्रथमच करतो आहे, त्यामुळे मला नक्कीच आनंद आणि समाधान वाटते आहे. मी विचार केला की, वेस्टवरून इस्टचा फ्लायओव्हर उतरतो तेव्हा या कांदिवली विधानसभेच्या टोकाशी जातो तेव्हा प्रत्येक अर्ध्या किलोमीटरवर अतुलजींचे प्रकल्प पाहायला मिळतात. त्यांची आमदार म्हणून नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत. आपले काम समजण्यासाठी लोकप्रतिनिधीला पाच वर्षे लागतात. पण अतुल भातखळकर हे थेट आमदारच बनले. नगरसेवक म्हणून काम केलेले असेल तर आमदार म्हणून सहजपणे काम करता येते असा माझा अनुभव आहे. पण अतुलजींनी आमदार म्हणून अत्यंत वेगाने कामे केली. शिवाय, या प्रकारच्या प्रकल्पांसाठी परवानगी मिळणे कठीण असते. पण अतुलजींनी हे कामही सहजतेने केले.

कांदिवली येथील आकुर्ली रोड येथे शनिवारी १३ मे रोजी या उपक्रमाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी रेस्क्यू फाउंडेशनच्या सह संस्थापक त्रिवेणी बेन आचार्य, नगरसेवक ठाकूर सागर सिंह हेदेखील उपस्थित होते. उदघाटनात प्रमुख अतिथी म्हणून खासदार गोपाळ शेट्टी आणि लॉयन्स क्लबचे अध्यक्ष मुंबई (प) राजेश जैन उपस्थित होते. तसेच व्यंकट सुब्रमणियम, भाजपा विधानसभा अध्यक्ष रामकृष्ण(आप्पा) बेलवलकर, नितीन चौहान आदी मान्यवर उपस्थित होते.

 

या उपक्रमाबद्दल आमदार अतुल भातखळकर म्हणाले की, या रोटी बँकच्या माध्यमातून १०० गरजूंना सकाळी व १०० लोकांना संध्याकाळी जेवण उपलब्ध करून दिले जाईल. घरात काही शुभकार्य असेल तिथूनही चांगले अन्न इथे उपलब्ध होईल. हे सेंटर नेटवर्किंग वाढेल तसेच वाढीस लागेल. अन्नदान करणाऱ्यांचीही संख्या भविष्यात वाढेल. एनजीओनाही आम्ही आवाहन केले आहे. हे सेंटर येत्या काळात नक्कीच खूप उपयुक्त ठरेल.

दोन वेळेचं अन्न न मिळाणाऱ्यांना सन्मानाने अन्न मिळावे यासाठी हा उपक्रम आहे.अनेकांकडे खायला अन्न नसते. अशांना रोटी बँकेकडून अन्न दिले जाते.या उपक्रमात मोफतचे दोन वेळेचे अन्न देण्यात येईल. अतुल भातखळकर यांच्या रोटी बँक या उपक्रमाबद्दल रेस्क्यू फाउंडेशनचे सह संस्थापक त्रिवेणी बेन आचार्य, नगरसेवक ठाकूर सागर सिंह यांनीही कौतुक केले. तसेच असे अनेक पुढे विविध उपक्रम राबवा आम्ही तुमच्या सोबत आहात असेही मान्यवर म्हणाले.

हे ही वाचा:

नवऱ्याने वऱ्हाडींसाठी चिकनचा धरला आग्रह आणि लग्न मोडले, वधूने मग धडा शिकवला!

गोल्डन बूट पुरस्कार विजेत्या अंध फुटबॉलपटूला बलात्कारप्रकरणी तुरुंगवास

पॉवरलिफ्टिंगमध्ये महाराष्ट्राची पदकांची लूट  

मोदींचा करिष्मा सोबत आहेच पण स्थानिक नेतृत्वाचे काय?

याठिकाणी पिण्यासाठी पाणपोईची व्यवस्थाही करण्यात आली आहे. तसेच शौचालयाची सोय करण्यात आली आहे ते सुद्धा मोफत. अतुल भातखळकर म्हणाले, आपण समाज कल्याणासाठी गोर गरिबांसाठी हा उपक्रम राबवत आहोत.रोटी बँक हा उपक्रम मुंबई उपनगरात पहिलाच आहे.आपल्या घरात अनेक कार्यक्रम साजरे केले जाते जसे लग्नसमारंभ ,वाढदिवस या समारंभात जे अन्न शिल्लक राहिले जाते ते टाकण्यापेक्षा या ‘रोटी बँकेत’ जमा करण्यात यावे.तसेच जुने कपडे ,चादर असे दान करण्यात यावे.ते पुढे म्हणाले ,माझ्या आईच्या स्मुर्तीदिनानिमित्त स्वतः एक लाख रुपये अनुकंपा संस्थेला देणार असल्याचे सांगितले.तुम्ही मला साथ द्या मी असे अनेक नवीन उपक्रम राबवण्यात येईल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा