झारखंड येथील देवघरमध्ये रोपवेच्या ट्रॉली धडकून मोठा अपघात झाल्याची धक्कादायक घटना रविवार, १० एप्रिल रोजी घडली आहे. रोपवेवरील दोन ट्रॉली एकमेकांना धडकून हा भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी आहेत. तर ४६ जण १२ ट्रॉलीमध्ये अडकून पडल्याची माहिती आहे.
घटनास्थळी बचावकार्य सुरू असून दोन एमआय- १७ हेलिकॉप्टर बचावकार्यात तैनात आहेत, अशी माहिती भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच एनडीआरएफ पथकही बचावकार्यात सहभागी आहे.
Two Mi-17 helicopters are involved in rescue operations in Deoghar district of Jharkhand where several people are stuck in a ropeway trolley due to a mishap. The operations are still on: Indian Air Force officials
— ANI (@ANI) April 11, 2022
झारखंडच्या देवघरमध्ये त्रिकुट डोंगरावर रोपवे च्या दोन ट्रॉली एकमेकांवर आदळून रविवारी हा अपघात घडला. रविवारी राम नवमीच्या निमित्ताने बाबा वैद्यनाथ मंदिरात जाण्यासाठी भाविकांची आणि पर्यटकांची या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती. दोन ट्रॉली एकमेकांसमोर आल्याने त्यांची टक्कर होऊन अपघात झाला. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे. जखमींना देवघर सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राज्य सरकारच्या विशेष विनंतीनुसार, भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर बचाव कार्यात सहभागी झाले आहे.
हे ही वाचा:
मानखुर्दमध्ये रामनवमीच्या मिरवणुकीत वाद
अभिनेते, पटकथा लेखक शिव सुब्रमण्यम यांचे निधन
मांसाहारावरून जेएनयूमध्ये वाद, सहा विद्यार्थी जखमी
श्रीलंकेनंतर नेपाळची अर्थव्यवस्था डळमळीत
झारखंड पर्यटन विभागाच्या माहितीनुसार, त्रिकुट रोपवे हा भारतातील सर्वात उंच उभा असा रोपवे आहे. हा रोपवे सुमारे ७६६ मीटर लांब आहे, तर ही टेकडी ३९२ मीटर उंचीची आहे.