देशात मकर संक्रांतीची तयारी जोरात सुरू आहे. आंध्र प्रदेशच्या ग्रामीण भागातही त्याची तयारी जोरात सुरू आहे. मकर संक्रांतीच्या निमित्ताने येथे कोंबड्यांच्या झुंजीच्या स्पर्धेचे आयोजन केले जाते.त्यामुळे अशा स्थितीत स्पर्धकांना (कोंबड्यांना) चांगल्या स्थितीत असणे आवश्यक आहे.परंतु, स्पर्धेच्या कोंबड्या मजबूत करण्यासाठी काही लोक अनोख्या पद्धतींचा अवलंब करत आहेत.वास्तविक, ‘रानीखेत’ नावाच्या विषाणूजन्य आजारामुळे अनेक चॅम्पियन कोंबड्या कमकुवत झाल्या आहेत. यामुळे त्यांचे मालक नाराज आहेत. संक्रांतीच्या मुहूर्तावर कोंबड्याची झुंज होणार आहे. यासाठी कोंबड्यांना मजबूत बनवण्यासाठी त्यांचे मालक कोंबड्यांना आहार म्हणून व्हायग्रा, शिलाजीत आणि जीवनसत्त्वे देत आहेत. तथापि, तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ही हार्मोन्स वाढवणारी औषधे केवळ कोंबड्यांनाच हानी पोहोचवत नाहीत, तर त्यांचे सेवन करणार्या मानवांवरही त्याचा विपरित परिणाम होऊ शकतात.
टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार,मकर संक्रांतीच्या दिवशी आंध्र प्रदेशातील अनेक भागात कोंबड्यांच्या झुंजीच्या स्पर्धेचे आयोजन केले जाते.जास्तकरून पूर्व गोदावरी, पश्चिम गोदावरी, गुंटूर आणि कृष्णा जिल्ह्यांमध्ये या स्पर्धेचे मोठया प्रमाणात आयोज केले जात. तथापि, २०१८ मध्ये सुप्रीम कोर्टाने कोंबड्यांच्या झुंजीवर बंदी घातली आहे.यावर्षी मकर संक्रांती १४, १५ आणि १६ जानेवारीला आहे आणि राज्याच्या अंतर्गत भागात हजारो बेकायदेशीर कोंबड्यांचे आखाडे आधीच उघडले आहेत, या ठिकाणी प्रशिक्षित कोंबडे एकमेकांशी स्पर्धा करून मरेपर्यंत मारामारी( झुंज) करतात.प्रेक्षक विजयी कोंबडीवर पैज लावतात. या परंपरेत मोठ्या प्रमाणावर पैसा गुंतला असून सणादरम्यान कोट्यवधी रुपयांचे व्यवहार होतात.
हे ही वाचा:
बिल्किस बानो प्रकरणातील दोषींच्या मुक्ततेप्रकरणी सोमवारी निकाल
आयएएफ सी १३० जे विमानाचे कारगिल हवाई पट्टीवर यशस्वी लँडिंग
टी २० विश्वचषक स्पर्धेत विराट-रोहित हवेच!
इस्रायलने केला हमासच्या आठ हजार दहशतवाद्यांचा खात्मा
दरम्यान, आंध्र प्रदेशमध्ये कोंबड्यांना ‘रानीखेत’ नावाच्या आजाराने ग्रासले आहे, ज्यामुळे ते अशक्त झाले आहेत आणि लढण्यासाठी योग्य स्थितीत नाहीत. संक्रांतीला फारच कमी अवधी उरला आहे, त्यामुळे काही कोंबडीपालक कोंबड्यांना शिलाजीत, व्हायग्रा १०० आणि जीवनसत्त्वे खाऊन ताकद देण्याचा प्रयत्न करत आहेत.परंतु, पशुवैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ही हार्मोन्स वाढवणारी औषधे कोंबड्यांना दिल्यामुळे त्यांनाच नाहीतर या कोंबड्यांच्या मांसाचे सेवन केल्यामुळे मानवावरही त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.मात्र, अशा प्रकारच्या औषधांचा कोंबड्यांवर वापर केल्यामुळे त्यांचे फायटिंग स्पिरिट वाढते की नाही हे स्पष्ट झालेले नाही.