23 C
Mumbai
Thursday, December 19, 2024
घरविशेषछत कोसळून ४० फूट खोल विहिरीत पडले, १३ जणांचा मृत्यू

छत कोसळून ४० फूट खोल विहिरीत पडले, १३ जणांचा मृत्यू

रामनवमीच्या दिवशी इंदूरच्या मंदिरात दुर्घटना

Google News Follow

Related

मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये रामनवमीच्या दिवशी मोठी दुर्घटना घडली. श्री बेलेश्वर महादेव झुलेलेलाल मंदिरात हवनानंतर कन्यापूजन सुरू होते. त्याचवेळी अचानक विहिरीचे छत कोसळले. छत कोसळताच ५० पेक्षा जास्त लोक विहिरीत पडले. या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. ही दुर्घटना स्नेह नगरजवळील पटेल नगर भागात घडली.

विहिरीचे छत कोसळताच एकच गोंधळ उडाला. काय झाले ते कुणाला क्षणभर कळलेच नाही. प्रसंगावधान दाखवत स्थानिक लोकांनी तातडीने हालचाल करून दहा जणांना बाहेर काढले. जखमींना ऍपल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्याला वेग आला आहे. या विहिरीला पायऱ्या होत्या. या पायऱ्यांची विहीर बेकायदेशीरपणे बांधण्यात आली आहे. याबाबत अनेकवेळा प्रशासनाकडे लेखी तक्रारही करण्यात आली असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. विहिरीचे छत कोसळताच त्यावर उभे असलेले लोक विहिरीमध्ये एकमेकांवर पडले. त्यामुळे अनेक लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. मृतांचा आकडाही वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

नेमके काय घडले

रामनवमीमुळे मंदिरात गर्दीही जास्त होती. घटना घडली त्यावेळी मंदिरात हवन केले जात होते. लोक विहिरीवर बसले होते. अचानक वजन वाढल्याने विहिरीचे छत खचले. काही समजण्यापूर्वीच लोक एकामागून एक विहिरीत पडले. पडलेल्यांमध्ये महिला आणि काही मुली असण्याचे सांगण्यात येत आहे. स्थानिकांनी तत्परता दाखवत सुमारे दहा जणांना बाहेर काढले ही दिलासादायक बाब आहे. सर्व भाविकांना मंदिराबाहेर काढण्यात आले आहे. विहिरीत पडलेल्यांची काय स्थिती आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांना दोरीच्या साह्याने बाहेर काढण्याचेही प्रयत्न सुरू आहेत.एसडीआरएफची टीमही अडकलेल्या लोकांची सुटका करत आहे.

हे ही वाचा:

एनसीबीने केले अंमली पदार्थांचे आंतरराज्यीय जाळे उद्ध्वस्त

मोदी-नेत्यानाहू यांच्यातील फरक राऊतांना कळतो तरी का?

संजय राऊतांना १००० रुपयांचा दंड; आरोप केले पण न्यायालयात हजरच नाही!

आत्मनिर्भर भारत मोहिमेंतर्गत भारत करणार ५,४०० संरक्षण उत्पादनांची खरेदी

मंदिर सुमारे ६० वर्षे जुने

हे मंदिर सुमारे ६० वर्षे जुने आहे. कन्यापूजनाचा कार्यक्रम असल्याने मंदिरात खूप गर्दी होती. विहीर ४० फूट खोल असून विहिरीत चार ते पाच फूट पाणी आहे.हवन सुरू असताना विहिरीच्या छतावर २५ पेक्षा जास्त लोक बसले होते. आजूबाजूला मुलांची देखील गर्दी होती नंतर वजन जास्त असल्याने त्याचे छत तुटले आणि लोक खाली पडले.

पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केले दुःख

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून इंदूरमधील घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. पंतप्रधानांनी ट्विट करून लिहिले की, इंदूरमधील घटनेमुळे मी खूप दुखावलो आहे. मुख्यमंत्री शिवराज यांच्याशी चर्चा करून परिस्थितीची माहिती घेतली. राज्य सरकार बचाव आणि मदत कार्यात वेगाने पुढे जात आहे. माझ्या प्रार्थना सर्व पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
214,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा