सुप्रसिद्ध फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो हा सलग तिसऱ्या वर्षी इन्स्टाग्रामवर सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू ठरला आहे. त्याचे या सोशल मीडिया पोर्टलवर जवळपास ६० कोटी फॉलोअर आहेत. जुलैमध्ये फोर्ब्सने रोनाल्डो हा जगातील सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू असल्याचे जाहीर केले होते.
‘हॉपर एचक्यू’ या कंपनीने इन्स्टाग्रामची सन २०२३ची श्रीमंतांची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार, रोनाल्डोने इन्स्टाग्रामच्या प्रत्येक पोस्टसाठी तब्बल ३.२३ दशलक्ष अमेरिकी डॉलरची कमाई केली. त्याचे फॉलोअर जवळपास ६० कोटी असल्याने इतकी मोठी तगडी रक्कम त्याला मिळते आहे. या यादीतील रोनाल्डोचा प्रमुख प्रतिस्पर्धी आहे, अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी. त्याला प्रत्येक इन्स्टाग्राम पोस्टसाठी जवळजवळ २.६ दशलक्ष अमेरिकी डॉलर मिळतात. या दोघांनी कमाईत केवळ खेळाडूंनाच मागे टाकले नसून गायिका सेलेना गोमेझ, रिअॅलिटी टीव्ही स्टार आणि उद्योजक काइली जेनर आणि अभिनेता ड्वेन जॉन्सन यांसारख्या प्रसिद्ध सेलिब्रिटींनाही मागे टाकले आहे.
हे ही वाचा:
मणिपूर हिंसाचार पीडितांच्या मानवतावादी पैलूंवर देखरेखीसाठी समिती
माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना लवकरच ईडीकडून समन्स
वंदे भारतमध्ये सिगारेटमुळे गोंधळ; धुरामुळे प्रवाशांची पळापळ
नरेंद्र मोदींचे चरणस्पर्श करणाऱ्या गायिकेने व्यक्त केला मोदींवर विश्वास
पहिल्या २० श्रीमंतांच्या यादीत भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आणि ब्राझीलचा फुटबॉलपटू नेयमार यांचाही समावेश आहे. नेयमार याने त्याचा ‘पॅरिस सेंट-जर्मेन’चा सहकारी, किलियन एमबाप्पे याच्या जवळपास दुप्पट कमाई केली आहे.
हॉपर एचक्यूचे सह-संस्थापक माईक बँदर यांनी याबाबत अधिक प्रकाश टाकला.
‘इन्स्टाग्रामवरील वार्षिक कमाई दरवर्षी वाढत आहे. रोनाल्डो आणि मेस्सी यांचा प्रभाव खेळपट्टीच्या पलीकडे डिजिटल क्षेत्रापर्यंत विस्तारला आहे. त्यामुळे त्यांचा वैयक्तिक ब्रँड वाढला आहे. रोनाल्डो आणि मेस्सी हे केवळ खेळपट्टीवरच वर्चस्व गाजवत नाहीत, तर डिजिटल क्षेत्रावरही प्रभुत्व मिळवतात. त्यांच्या या वैयक्तिक ‘ब्रँड’चा सामान्य लोकांवर प्रभाव पडतो,’ असेही ते म्हणाले.