२२ जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडणार आहे.या सोहळ्याला देशभरातील नामवंत व्यक्तींना निमंत्रित करण्यात आलं आहे.यामध्ये कलाकार, साहित्यिक, धार्मिक नेते आणि क्रीडा जगतातील मोठ्या व्यक्तींचा समावेश आहे.या प्राण प्रतिष्ठेसाठी तब्ब्ल ७ हजार जणांना आमंत्रण देण्यात आलं आहे. अयोध्येतील नव्या राम मंदिराचे उद्घाटन आणि प्रभू श्री रामाचा अभिषेक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून क्रिकेटर सचिन तेंडुलकर, विराट कोहली, फिल्म स्टार अमिताभ बच्चन, उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्यासह जवळपास सात हजार जणांना, राम मंदिरात राम ललांच्या प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाचे निमंत्रण पाठवलं आहे.तेसच दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या ‘रामायण’ मालिकेत भगवान श्रीरामांची भूमिका साकारणारे अरुण गोविल आणि देवी सीतेची भूमिका साकारणाऱ्या दीपिका चिखलिया यांनाही या कार्यक्रमाचे आमंत्रण पाठवण्यात आलं आहे. याशिवाय या कार्यक्रमासाठी १९९२ मध्ये मारल्या गेलेल्या कारसेवकांच्या कुटुंबीयांनाही आमंत्रित करण्यात येणार आहे. आमंत्रित व्हीव्हीआयपींमध्ये राष्ट्रीय स्वयं सेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, योग गुरु राम देव, उद्योगपती रतन टाटा, उद्योगपति गौतम अदाणी यांचा समावेश आहे.
हे ही वाचा:
‘अशोक गेहलोत, पोलिसांनी सुरक्षा पुरवली नाही’
‘पूरपरिस्थिती असूनही मुंबईची न्यायालये काम थांबवत नाहीत’
सन २०२०पासून आतापर्यंत भारतीय संघाला लाभले ३२ सलामीवीर!
स्वानंद किरकिरे आणि ‘ऍनिमल’ टीममध्ये जुंपली!
राम मंदिर आंदोलनाचं नेतृत्व करणारे भाजपचे बडे नेतेही प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात दिसणार आहेत. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, विनय कटियार, साध्वी ऋतंभरा आणि उमा भारती यांनाही निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. याशिवाय विविध धर्मगुरूही राम लालाच्या अभिषेक सोहळ्यात सहभागी होणार आहेत. त्यात केवळ हिंदूच नव्हे तर जैन धर्मातील महागुरूंचाही समावेश करण्यात आला आहे. जैन धर्मगुरू आचार्य लोकेश मुनी यांनाही मंदिर ट्रस्टनं कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केलं आहे.