२१ जुलैला रोहितने आपला प्रवास सुरू केला आणि २२ जुलैला तो गुजरातमधील कच्छला पोहोचला. ही कौतुकास्पद कामगिरी त्याने केली आहे.
जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांच्या कालावधीत रोहित नावाच्या पक्ष्यांवर जीपीएस यंत्रणा बसवण्यात आली असून, यातील चार रोहित पक्षांनी गुजरातच्या दिशेने प्रवास केला आहे. तर उर्वरित २ पक्षी अजूनही मुंबईत परिसरात स्थित आहेत. यातील लेस्टर नावाच्या रोहित पक्षाने २१ जुलै रोजी प्रवास चालू केला आणि २२ जुलै पर्यंत रात्री गुजरातमधील कच्छच्या छोट्या रणामध्ये प्रवास थांबवला. हा एकूण ५०० किलोमीटरचा प्रवास असून त्यासाठी एकूण २५ तासांचा कालावधी लागला.
जीपीएस यंत्रणेद्वारे पक्षाच्या सर्व बारीकसारीक हालचालीवर लक्ष ठेवता येते. या प्रवासादरम्यान लेस्टर नावाच्या रोहित पक्षाने तब्बल ११ तास ३३ मिनिटांची विश्रांती घेतली. पक्षांच्या प्रवास मार्गांची माहिती मिळाल्याने ते कुठे थांबतात, तिथे उभे असलेल्या पाणथळ जाग्यावरील भविष्यातील सुरक्षितता, मुंबईतील त्यांचे वावर यांची प्रत्यक्ष माहिती मिळते. लेस्टरचा प्रवास हुमायून नावाच्या रोहित पक्षाच्या मार्गाप्रमाणेच होता. अशी माहिती बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे उपसंचालक राहुल खोत यांनी दिली.
हे ही वाचा:
“संजय राऊत यांच्यावर होत असलेल्या कारवाईने आन
“आमची सकाळ खराब करणाऱ्यांची सकाळ खराब होत असताना पाहून समाधान वाटतंय”
…ईडीचे अधिकारी घरी आले की सोबत घेऊनच जातात!
जीपीएस यंत्रणेची रचना
जीपीएस यंत्रणा ही काडीपेटीच्या आकाराएवढी असून, मोबाईल नेटवर्कच्या आधारे जोडलेले आहे. त्याच्यावर सोलर पॅनल बसवलेले असते. त्यामुळे पक्षांचा उडण्याचा वेग, दिशा, उंची, तापमान, भोगोलिक स्थिती ह्यांची माहिती जीपीएस द्वारे मिळत राहते. ही माहिती दर चार-पाच तासांनी जवळच्या मोबाईल टॉवरकडे माहिती पाठवली जाते व मग ही माहिती अभ्यासकांपर्यंत पोहोचते.