33 C
Mumbai
Monday, November 18, 2024
घरविशेषरोहित-शुभमनच्या शतकांनी अनेक विक्रम मोडित

रोहित-शुभमनच्या शतकांनी अनेक विक्रम मोडित

Google News Follow

Related

कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी टीम इंडियाकडून धरमशाला कसोटीत दमदार शतके झळकावली. भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिकेतील शेवटचा सामना खेळला जात आहे. भारताने सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या डावात रोहितने १०३ तर शुभमनने ११० धावांची खेळी केली. या दोघांमध्ये १७१ धावांची भागीदारी झाली. रोहित आणि शुभमनच्या शतकी खेळीने अनेक मोठे विक्रम मोडले. रोहित सलामीवीर म्हणून भारताकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे.

टीम इंडियाकडून इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सलामीच्या सामन्यात सर्वाधिक शतके ठोकण्याच्या बाबतीत रोहित संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. रोहितने ४ शतके झळकावली आहेत. सुनील गावस्कर यांनीही ४ शतके झळकावली आहेत. यात विजय मर्चंट, केएल राहुल आणि मुरली विजय संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. या खेळाडूंनी ३-३ शतके झळकावली आहेत.

शुभमनने जडेजाला मागे टाकले


रोहित २०२१ नंतर भारताकडून सर्वाधिक कसोटी शतक करणारा फलंदाज बनला आहे. त्याने ६ शतके झळकावली आहेत. या बाबतीत शुभमन गिल दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. गिलने रवींद्र जडेजाला मागे टाकले आहे. जडेजा, यशस्वी जयस्वाल आणि ऋषभ पंत यांनी ३-३ शतके झळकावली आहेत.

रोहित शर्माने मोडला ख्रिस गेलचा विक्रम


रोहितने ख्रिस गेलला मागे टाकले आहे. सलामीवीर म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकण्याच्या बाबतीत रोहित तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने ४३ शतके झळकावली आहेत. ख्रिस गेल चौथ्या क्रमांकावर आहे. गिलने ४२ शतके झळकावली आहेत. डेव्हिड वॉर्नर ४९ शतकांसह पहिल्या स्थानावर आहे. सचिन तेंडुलकर दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने ४५ शतके झळकावली आहेत.

हेही वाचा :

इंग्लंडची निराशाजनक कामगिरी पाहून नासिर हुसैन संतापले!

१० बस बदलल्या, वेगवेगळे कपडे घातले.. बेंगळुरू कॅफे बॉम्बस्फोट संशयितांची माहिती समोर!

“मराठा आरक्षणाअंतर्गत होत असलेली भरती प्रक्रिया न्यायालयाच्या अधीन राहणार”

बेंगळुरू; कार धुण्यासाठी, बागकामासाठी पिण्याच्या पाण्याच्या वापरावर सरकारची बंदी!

टीम इंडियासाठी रोहित-शुभमनची दमदार भागीदारी
रोहितने १६२ चेंडूंचा सामना करत १०३ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत १३ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. शुभमनने १५० चेंडूत ११० धावा केल्या. गिलच्या डावात १२ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता. दोघांमध्ये १७१ धावांची भागीदारी झाली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा