शतकवीर रोहितमुळे भारताकडून अफगाणिस्तान स्वस्तात पराभूत

भारताचा वर्ल्डकपमधील दुसरा विजय

शतकवीर रोहितमुळे भारताकडून अफगाणिस्तान स्वस्तात पराभूत

भारताचा कर्णधार रोहित शर्माने केलेल्या शतकी खेळीमुळे भारताने अफगाणिस्तानवर ८ विकेट्सनी विजय मिळवत वनडे वर्ल्डकपमधील आपल्या दुसऱ्या विजयाची नोंद केली. या विजयासह भारत तक्त्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताच्या खात्यात ४ गुण आहेत. न्यूझीलंड पहिल्या क्रमांकावर असून त्यांच्याकडेही ४ गुण आहेत तर पाकिस्तानकडेही ४ गुण आहेत.

 

रोहित शर्माने वनडेमधील आपले ३१वे शतक दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये झळकावले. रोहितने ६३ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. वर्ल्डकपमधील सर्वात वेगवान असे शतक त्याने ठोकले. कपिल देव यांनी याआधी ७२ चेंडूंत झिम्बाब्वेविरुद्ध १९८३च्या वर्ल्डकपमध्ये शतक झळकाविले होते. तो विक्रम रोहितने मोडित काढला.

 

 

या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि ८ बाद २७२ धावा केल्या. पण भारताला हे आव्हान जड गेले नाही. रोहितच्या शतकामुळे विजयाचा मार्ग सोपा झाला. इतर फलंदाजांनी त्यात आवश्यक ते योगदान दिले.

हे ही वाचा:

एकनाथ शिंदेंना नक्षलवाद्यांच्या तोंडी दिले जाणार होते!

ड्रग्ज माफिया ललित पाटील याचे उद्धव ठाकरेंसोबतचे फोटो व्हायरल!

पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाइंड शाहिद लतिफची पाकिस्तानात हत्या

शहीद चंद्रशेखर आझाद यांच्या चकमकीची नोंद सापडली

 

भारताच्या जसप्रीत बूमराहने ३९ धावांत ४ बळी घेत सर्वोत्तम कामगिरी केली तर हार्दिक पंड्याने ४३ धावांत २ बळी घेतले. अफगाणिस्तानतर्फे हशमतुल्ला शाहिदीने ८० धावांची तर ओमरझाईने ६२ धावांची खेळी केली. त्यामुळे त्याने अडीचशे धावांचा टप्पा ओलांडता आला.

 

 

अफगाणिस्तानच्या या आव्हानाला सामोरे जाताना भारताची सुरुवात मात्र दमदार झाली. पहिल्या विकेटसाठी रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी १५६ धावांची भागीदारी केली. तिथेच भारताच्या विजयाचा पाया रचला गेला. इशानला मात्र अर्धशतकासाठी ३ धावा कमी पडल्या. त्यानंतर विराट आणि रोहित यांनी दुसऱ्या विकेटसाठी ४९ धावा जोडल्या. विराटने मात्र नाबाद ५५ धावांची खेळी केली.

 

 

रोहितने वर्ल्डकपमधील सर्वोत्तम कामगिरी केलीच पण वर्ल्डकपमधील सचिन तेंडुलकरचा शतकांचा विक्रमही त्याने मोडित काढला. सचिनने पाच वर्ल्डकपमध्ये ६ शतके ठोकली होती. त्याने ४१ डावांत ही सहा शतके केली. पण रोहितने मात्र १९ डावांतच सात शतके ठोकली. आजचा दिवस रोहितचाच होता. त्याने वर्ल्डकपमधील १००० धावांचा टप्पाही ओलांडला. तेंडुलकर, विराट, सौरव गांगुली यांच्यानंतर हजार धावांचा टप्पा ओलांडणारा तो चौथा भारतीय फलंदाज ठरला. त्याने षटकारांचाही विक्रम वर्ल्डकपमध्ये केला. वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलच्या नावे ५५३ षटकारांचा विक्रम होता. रोहितने त्याला मागे टाकले. त्याने एकूण ३ षटकार लगावत षटकारांत अव्वल स्थान मिळविले.

 

रोहितचे विक्रम

Exit mobile version