रोहित शर्मा हा कायमच त्याच्या खिलाडूवृत्तीमुळे प्रेक्षकांचा लाडका राहिला आहे. काल झालेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स या सामन्यात असा एक प्रसंग उद्भवला की त्यानंतर फॅन्सच्या मनातील रोहित शर्माचं स्थान अजूनच उंचावलं.
रोहित शर्मा आणि कृणाल पंड्या यांनी बुधवारी अबू धाबी येथे चालू असलेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२१ मोसमातील पंजाब किंग्ज (पीबीकेएस) विरुद्ध मुंबई इंडियन्सच्या (एमआय) विजयादरम्यान क्रिकेट चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. दोन्ही संघ सध्या आयपीएल २०२१ च्या प्लेऑफच्या शर्यतीत अडकलेले असताना, एमआयचा कर्णधार रोहित शर्मा आणि कृणाल पांड्याने खिलाडूवृत्ती दाखवली. पीबीकेएसचा कर्णधार केएल राहुलविरोधातील रन-आउट अपील मागे घेत दोघांनीही क्रिकेट रसिकांची मनं जिंकली. पीबीकेएसच्या डावाच्या सहाव्या षटकात, क्रिस गेलने कृणाल पंड्याने टाकलेल्या शेवटच्या चेंडूला नॉन-स्ट्रायकरच्या भूमिकेत असलेल्या पीबीकेएसचा कर्णधार केएल राहुलला चेंडू लागला आणि कृणालकडे गेला. कृणालने खेळाच्या नादात राहुलला धावबाद केले.
कृणालने पंचांकडे याबाबत अपीलही केले, पण नंतर एमआयचा कर्णधार रोहित शर्माने इशारा चर्चा केल्यानंतर त्याने ते अपील मागे घेतले. राहुल पंजाबसाठी मॅच-विनर बनू शकला असला तरी रोहित शर्माने हा दिलदारपणा दाखवला. या घटनेला रोहितच्या आणि क्रिकेटच्या चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिला.
हे ही वाचा:
अमेरिकेचे लष्करी नेतृत्व आणि बायडन यांच्यातच मतभेद?
लडाख सीमेवर चीनची पुन्हा लुडबुड सुरू!
१३६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना एमआयने २० षटकांत ४ बाद १३७ धावा केल्या आणि सहा गडी राखून विजय मिळवला. एमआयचा संघ सध्या ११ सामन्यांत १० गुणांसह लीग टेबलमध्ये पाचव्या स्थानावर आहे. त्यांच्या पुढील सामन्यात शनिवारी दिल्ली कॅपिटल्स यांच्याशी मुकाबला करायचा आहे.