30 C
Mumbai
Saturday, December 28, 2024
घरविशेषरोहित शर्मा पाकिस्तानविरुद्ध खेळणार!

रोहित शर्मा पाकिस्तानविरुद्ध खेळणार!

हातामध्ये एक सौम्य वेदना, बाकी सर्वकाही अलबेल

Google News Follow

Related

टी-२० विश्वचषक २०२४ ची भारताची सुरुवात मोठ्या दणक्यात विजयाने झालेली आहे. टी-२० विश्वचषक २०२४चा आठवा सामना भारत आणि आयर्लंड यांच्यात न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळला गेला. या सामन्यात आयर्लंड फारची चमक दाखवू शकला नाही. शंभरीच्या आत त्यांचा संपूर्ण संघ तंबूत परतला. टीम इंडियाने हा सामना आठ गडी राखून जिंकला. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मा फलंदाजी करताना दुखापतग्रस्त झाला. अर्धशतक झळकावल्यानंतर रिटायर्ड हर्ट होऊन रोहित शर्मा माघारी परतला होता.

रोहित शर्माची दुखापत किरकोळ
सामन्यानंतर रोहित शर्माने त्याच्या दुखापतीबद्दल माहिती दिली आहे. फक्त हातामध्ये एक सौम्य वेदना आहे, बाकी सर्वकाही अलबेल आहे.

नवीन खेळपट्टी बेभरोवशाची
खेळपट्टीबद्दल रोहित शर्मा म्हणाला, ‘मला माहित नाही की खेळपट्टीकडून काय अपेक्षा करावी. खेळपट्टी अशीच असणार आहे, याचा विचार करून आम्ही पुढची तयारी करू. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात संपूर्ण संघाला चांगली कामगिरी करावी लागणार आहे. चार फिरकीपटू खेळवणे शक्य होणार नाही. आजच्याप्रमाणे पाकिस्तानच्या सामन्यातही कामगिरी चांगली होईल, अशी आशा आहे.

कशी असेल पाकिस्तानविरुद्ध रणनिती?
पाकिस्तानविरुद्ध रणनीती शेअर करताना रोहित शर्मा म्हणाला, गोलंदाजांना या खेळपट्टीची भरपूर मदत मिळत होती. आम्ही हीच परिस्थिती लक्षात घेऊन पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याची तयारी करू. हा एक असा सामना असेल ज्यामध्ये संपूर्ण संघाला या सामन्यात चांगली कामगिरी करावी लागेल.

हेही वाचा :

स्वप्नील सावरकर यांना ‘व्रतस्थ पत्रकारिता’ पुरस्कार

उत्तराखंडमध्ये बेपत्ता ट्रेकर्सच्या मृत्यूच्या संख्येत वाढ, आणखी ५ दगावले!

‘भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्सची तिसऱ्यांदा अवकाशात झेप’

इस्रायलकडून गाझामधील शाळेवर हल्ला; २७ जण ठार

भारताने आयर्लंडला सहज नमवले
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना आयरिश संघ पूर्णपणे गडबडला. संपूर्ण संघ २० षटकेही खेळू शकला नाही. आयरिश संघ १६ षटकांत सर्वबाद केवळ ९६ धावाच करू शकला. आयर्लंडच्या एकाही खेळाडूला ३० धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. आयर्लंडकडून गॅरेथ डेलेनीने सर्वाधिक धावा केल्या. त्याने १४ चेंडूत २ चौकार आणि २ षटकारांसह २६ धावा केल्या.

प्रत्युत्तरात भारताने पहिल्याच षटकात विराट कोहलीच्या रूपाने पहिली विकेट गमावली. कमी धावसंख्या असूनही टीम इंडिया सावध खेळ करत होती. रोहित शर्माने अर्धशतक झळकावले आणि दुखापतीमुळे निवृत्त झाला. भारताने हे लक्ष्य केवळ १२.२ षटकांत पूर्ण केले. भारताने २ गडी गमावून ९७ धावांचे आव्हान पार केले.

 

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा