25 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरविशेषरोहित शर्माने मारला हास्यषटकार... त्याच्या हातात झेल बसला नसता तर त्याला बसवला...

रोहित शर्माने मारला हास्यषटकार… त्याच्या हातात झेल बसला नसता तर त्याला बसवला असता!

विश्वविजेत्या संघातील चार महाराष्ट्रातील खेळाडूंचा विधानभवनात सत्कार

Google News Follow

Related

कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने तब्बल १७ वर्षानंतर टी- २० विश्वचषकावर नाव कोरले. यानंतर देशभरातून भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मुंबईत या संघाची खास विजयी मिरवणूक देखील काढण्यात आली होती. या संघात चार महाराष्ट्राच्या खेळाडूंचाही समावेश होता. कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जैयस्वाल हे महाराष्ट्राचे पुत्र विश्वविजेत्या संघाचे सदस्य होते. या सर्वांचा सत्कार समारंभ महाराष्ट्र राज्य सरकारने आयोजित केला होता. विधानभवनात हा सोहळा पार पडला.

यावेळी भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने त्याच्या भावना व्यक्त करताना मिश्कील टिपण्णी करत सर्वांच्या चेहऱ्यावर हसू आणले. विधानभवनात मराठीत भाषण करत रोहित शर्माने जबरदस्त फटकेबाजी केली. आपल्या खास मुंबई शैलीत त्याने सर्वांचे आभार मानले. तसेच त्याने सूर्यकुमार यादवच्या झेलवरही भाष्य केले. त्याने केलेल्या वक्तव्याने सभागृहात हशा पिकला. रोहित शर्मा म्हणाला, बरं झालं, सूर्याच्या हातात कॅच बसला, नाहीतर त्याला घरी बसवलं असतं. रोहित शर्मा याचे हे वाक्य ऐकताच सभागृहात एकच हशा पिकला.

“सर्वांना माझा नमस्कार. इथं बोलवल्यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खूप खूप आभार. आमच्यासाठी असा कार्यक्रम केला, त्याबद्दल आभार. काल मुंबईमध्ये जे काही पाहिले, ते स्वप्नवत होतं. विश्वचषक जिंकणं आमचं स्वप्न होतं. २०२३ मध्ये संधी थोडक्यात हुकली होती. सूर्या, दुबे किंवा माझ्या एक्त्यामुळे हे झालं नाही. सर्वांमुळे हे स्वप्न सत्यात उतरलं. सर्व सहकारी माझ्यासोबत होते, त्यांनी प्रयत्न केले. प्रत्येक सामन्याचा नायक वेगळा होता,” असं म्हणत रोहित शर्मा याने पुन्हा एकदा विजयाचे श्रेय संपूर्ण भारतीय संघाला दिले.

हे ही वाचा..

जगातील पहिली सीएनजी बाईक नितीन गडकरींच्या हस्ते पुण्यात लाँच

हिंदुत्ववादी शिवानी राजा ब्रिटनच्या निवडणुकीत जिंकल्या!

तोंडावर आपटलेल्या काँग्रेसचे पुन्हा लष्करावर प्रश्नचिन्ह!

पंतप्रधान मोदींचा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जाणाऱ्या खेळाडूंशी संवाद

विश्वचषक विजेत्या भारतीय संघातील खेळाडूंचा विधिमंडळात सत्कार करण्यात आला. रोहित शर्मा, यशस्वी जैयस्वाल, शिवम दुबे, सूर्यकुमार यादव या खेळाडूंचा सत्कार राज्य सरकारने केला. सपोर्ट स्टाफमधील गोलंदाजी कोच पारस यांचाही सत्कार करण्यात आला. सत्कार समारंभावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित यांच्यासह सर्वच आमदार उपस्थित होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा