‘भारताचे फलंदाज चांगले खेळले नाहीत; खेळपट्टीला दोष देणार नाही’

कर्णधार रोहित शर्मा याचे स्पष्टीकरण

‘भारताचे फलंदाज चांगले खेळले नाहीत; खेळपट्टीला दोष देणार नाही’

सलग दहा सामने जिंकून अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या संघाला नेस्तनाबूत करण्याचे भारताचे स्वप्न भंग पावले. ‘भारताच्या खेळाडूंनी या खेळपट्टीवर चांगली बॅटिंग केली नाही,’ अशी कबुली भारताचा कर्णधार रोहित शर्माने दिली.

अंतिम सामन्यासाठी तयार केलेली खेळपट्टी अतिशय कोरडी होती आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून भारताला पहिल्यांदा फलंदाजी करण्यासाठी आमंत्रण दिले.रोहत शर्माने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. त्याने ३१ चेंडूंमध् ४७ धावा चोपल्या. मात्र नंतर खेळपट्टी धीमी झाली आणि तळपत्या उन्हामुळे चेंडूवर परिणाम होऊन धावगतीही कमी झाली.

‘निकाल आमच्या बाजूने लागला नाही. आम्ही आज चांगला खेळ केला नाही. आम्ही हरप्रकारे प्रयत्न केले, मात्र ते तसे व्हायला नको होते. आणखी २०-२० धावा केल्या असत्या तर सामना जिंकण्याची आशा होती. के. एल. राहुल आणि कोहली यांनी चांगली भागीदारी रचली. आम्ही २७०-२८० धावा करू, असे आम्ही लक्ष्य धरले होते. पण आम्ही एकामागोमाग विकेट गमावल्या,’ असे रोहित शर्मा सामन्यानंतर म्हणाला.

हे ही वाचा:

पुण्यात कोयता गँगची दहशत; पाठलाग करत इमारतीच्या छतावर तरुणाची हत्या

भारत पराभूत झाला, पण ऑस्ट्रेलिया का जिंकली?

ओलिसांच्या सुटकेच्या बदल्यात युद्धविराम नाही

भारताचे एकच सामना गमावला, तीही ‘फायनल’, ऑस्ट्रेलियाला सहावे विश्वविजेतेपद

भारताचे गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शामी यांनी सुरुवातीला झटपट डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श आणि स्टिव्ह स्मिथ यांच्या विकेट घेतल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची अवस्था तीन बाद ४७ झाली होती. मात्र ट्रेव्हिस हेडने सामन्याची सूत्रे हाती घेतली आणि भारतीय चाहत्यांमध्ये शांतता पसरली. त्याने शतक ठोकले. त्याला साथ दिली ती मार्नस लाबुशेन याने. त्याने ११० चेंडूंत ५८ धावा केल्या.

 

‘जेव्हा तुमची धावसंख्या २४० असते, तेव्हा तुम्हाला विकेट घेणे भाग आहे. मात्र याचे संपूर्ण श्रेय हेड आणि लाबुशेनला जाते. त्यांनी चांगली भागीदारी रचून आमच्या विजयाच्या आशा धुळीला मिळवल्या. आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले. आम्ही सुरुवातीला झटपट तीन विकेट मिळवल्या. आम्हाला आणखी एक विकेट मिळाली असती तर सामना जिंकण्याची आशा होती. मधल्या फळीतील या दोन खेळाडूंनी अविस्मरणीय खेळ केला,’ अशा शब्दांत रोहितने हेड आणि लाबूशेनचे कौतुक केले.

Exit mobile version