रोहित शर्माने सांगितले, अंपायरला दंड दाखविण्याचे कारण

रोहित शर्मा आणि अंपायर इरास्मस यांच्यात छोट संभाषण झालं होतं

रोहित शर्माने सांगितले, अंपायरला दंड दाखविण्याचे कारण

भारतात सध्या क्रिकेट विश्वचषकाचा थरार रंगात आला आहे. या स्पर्धेत शनिवार, १४ ऑक्टोबर रोजी पारंपारिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान आमने सामने आले होते. या थरारक साम्नायामध्ये भारताने बाजी मारत सामना खिशात घातला. सुरुवातील गोलंदाजांनी कमाल दाखवत पाकिस्तानला २०० धावांचा टप्पाही गाठू दिला नाही. तर, नंतर भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या ८६ धावांच्या जोरावर भारताने सामना जिंकला.

पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात रोहित शर्माने ६३ चेंडूत ८६ धावा केल्या. यावेळी त्याने सहा चौकार आणि सहा षटकार लगावले. या धडाकेबाज खेळीनंतर रोहित शर्मा आणि अंपायर इरास्मस यांच्यात एक छोट संभाषण झालं. त्यावेळी रोहित शर्माने इरास्मस यांना आपला दंड दाखवला. सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. अखेर रोहितने अंपायरला दंड का दाखवला असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. याचा उलगडा रोहित शर्माने सामन्यानंतर हार्दिक पांड्याशी बोलताना केला.

भारतीय संघ पाकिस्तानविरूद्धचा विजय साजरा करत असताना हार्दिक पांड्याने रोहित शर्माला अंपायरला बायसेप्स दाखवण्याबद्दल विचारले. त्यावेळी रोहित शर्माने मैदानावर त्यावेळी काय झाले याचा उलगडा केला. रोहित म्हणाला, “ते मला विचारत होते की तू एवढ्या लांब षटकार कसा मारतो, तुझ्या बॅटमध्ये काहीतरी आहे. मी त्यांना म्हणालो की बॅटमध्ये काही नाही ही माझी तर ताकद आहे.”

हे ही वाचा:

इराणचा इशारा; गाझावरील हल्ले इस्रायलने थांबवावेत नाहीतर….

भारतापुढे पाकिस्तानची दाणादाण, भारताचा आठवा वर्ल्डकप विजय

प्रशांत किशोर यांनी दिले नीतिश कुमारांना आव्हान

इस्रायलने केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये हमासच्या एरियल फोर्सचा प्रमुख ठार

गेल्या आठ वनडे सामन्यात रोहित शर्माने दोन शतकी आणि चार अर्धशतकी खेळी केल्या आहेत. वर्ल्डकप २०२३ च्या ग्रुप स्टेजमधील सामन्यात देखील रोहित शर्माने पाकिस्तानी गोलंदाजांची धुलाई केली आहे. रोहित शर्माने ६३ चेंडूत ८६ धावांची दमदार खेळी केली.

Exit mobile version