युनिव्हर्सल बॉसला मागे टाकल्याचा आनंद, पण बॉस तोच!

रोहित शर्माने व्यक्त केली प्रतिक्रिया

युनिव्हर्सल बॉसला मागे टाकल्याचा आनंद, पण बॉस तोच!

भारताचा कर्णधार रोहित शर्माने ख्रिस गेलचा षटकारांचा विक्रम मोडीत काढल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली. आपल्या या क्रिकेटच्या प्रवासात ख्रिस गेल अर्थात युनिव्हर्सल बॉसकडूनच आपल्याला प्रेरणा मिळाल्याचे रोहित म्हणाला. अफगाणिस्तानवर विजय मिळविल्यानंतर आपल्या विक्रमाबद्दल आणि भारतीय संघाच्या कामगिरीबद्दल रोहितने सांगितले.

 

 

रोहितने वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेत अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात ८१ चेंडूंत १३१ धावांची खेळी केली. त्यात त्याने ख्रिस गेलच्या ५५६ षटकारांचा विक्रमही मागे टाकला. त्याने पाच षटकार या सामन्यात खेचले. रोहितने ४५३ सामन्यानंतर हा विक्रम नोंदविला. आता ख्रिस गेलपेक्षा त्याच्या खात्यात तीन अधिक षटकार आहे. पण गेलपेक्षा ३० कमी सामने खेळून रोहितने हा पराक्रम केला आहे.

 

रोहितने त्याबद्दल गेलचे कौतुक करताना म्हटले की, युनिव्हर्सल बॉस हा युनिव्हर्सल बॉसच आहे. पण गेली अनेक वर्षे गेलला खेळताना आपण पाहात आलो आहोत. षटकार खेचणारे ते एक यंत्र आहे. आम्ही दोघेही ४५ क्रमांकाचीच जर्सी घालतो. त्यामुळे आज हा विक्रम झाल्यावर गेल नक्कीच खूश असेल. बीसीसीआयने जारी केलेल्या व्हीडिओत रोहितने आपले हे मत व्यक्त केले आहे.

हे ही वाचा:

सुप्रियाताईंना १०० कोटी वसुली करून देणारा गृहमंत्रीच आवडत असेल!

पंतप्रधानांनी पिठोरागडमध्ये केले कैलास दर्शन, भक्तांसाठी नवा मार्ग

खलिस्तानी समर्थक दहशतवाद्यांना घरी ठेवणाऱ्याला कॅनडाचा आश्रय

भारतातील इस्रायली नागरीक चिंतेत!

 

रोहितने सांगितले की, षटकार खेचण्याचे हे तंत्र विकसित करण्यासाठी मला बरीच मेहनत करावी लागली. जेव्हा मी क्रिकेट खेळायला सुरुवात केली तेव्हा मला असे वाटतच नव्हते की मी कधी षटकार मारू शकेन. त्यामुळे अनेक षटकार मारणे तर दूरच राहिले. पण अनेक वर्षे मेहनत घेतली आणि त्यातून हे तंत्र विकसित केले. पण मी जी कामगिरी केली त्यामुळे समाधानी राहण्यातला नाही. मेहनत करत राहायला हवी याकडे माझे लक्ष आहे. अर्थात, आताची ही कामगिरी माझ्यासाठी आनंददायक आहे.

 

 

३६ वर्षीय रोहित शर्माने अफगाणिस्तानवर मिळालेल्या विजयाबद्दल आपल्या गोलंदाजांना शाबासकी दिली. आम्ही अतिशय छान खेळ केला. अफगाणिस्तानला २७० धावसंख्येवर रोखण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले. कारण ही खेळपट्टी फलंदाजीसाठी उत्तम असतानाही गोलंदाजांना दमदार कामगिरी करून दाखविली. पण संघातील सर्व खेळाडूंनी नॉकआऊट लढतींकडे लक्ष देण्याऐवजी आता आपल्याकडे जी जबाबदारी आहे ती पार पाडण्याकडे लक्ष द्यायला हवे. कारण या स्पर्धेची रचनाच आव्हानात्मक आहे. नऊ साखळी सामने आणि नंतर उपांत्य फेरी, अंतिम फेरी असे खेळावे लागणार आहे. त्यामुळे प्रत्येक सामना महत्त्वा असेल.

Exit mobile version