रोहित शर्मा होणार भारतीय संघाचा कर्णधार?

रोहित शर्मा होणार भारतीय संघाचा कर्णधार?

भारतीय क्रिकेट संघाचा स्फोटक सलामीवीर रोहित शर्मा हा भारतीय संघाचा कर्णधार होणार असल्याची चर्चा रंगली आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात होऊ घातलेल्या टी-२० विश्वचषकानंतर रोहित शर्माकडे संघाचे नेतृत्व दिले जाईल अशा बातम्या येत आहेत. भारतीय संघाचा विद्यमान कर्णधार विराट कोहली हा आपल्या कर्णधार पदाच्या जबाबदारीतून मुक्त होणार असून रोहितकडे संघाची कमान सोपवली जाईल. रोहित सध्या भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार आहे.

टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्राने सूत्रांच्या हवाले ही बातमी दिली आहे. आगामी टी-२० विश्वचषकानंतर भारतीय क्रिकेट संघात मोठे बदल केले जाणार आहेत. विराट कोहलीकडे सध्या एक दिवसीय, टी-२० तसेच कसोटी संघाचे नेतृत्व आहे. कर्णधार कोहलीची यातून मुक्तता केली जाण्याची शक्यता आहे. या बदलांनंतर कसोटी संघाचे कर्णधारपद कोहलीकडे असेल. पण मर्यादित षटकांच्या प्रकारांमध्ये म्हणजेच एक दिवसीय आणि टी-२० संघाचे नेतृत्व रोहित शर्मा करेल.

हे ही वाचा:

बाप रे! मुंबईत ७ महिन्यांत घडले ५५० बलात्काराचे गुन्हे

ठाकरे सरकार बेजबाबदार आणि असंवेदनशील! महिला आयोगाचे ताशेरे

पैशाचे आमिष दाखवून धर्मांतर करणारा ख्रिस्ती भोंदू अटकेत

मेडवेडेवने जिंकले ‘अमेरिकन ड्रीम’! जोकोविचचे ऐतिहासिक स्वप्न भंगले

विराट कोहली याने स्वतःहूनच हा निर्णय घेतल्याचे समजते. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत संघाचे नेतृत्व करत असताना विराटच्या वैयक्तिक खेळावर त्याचा परिणाम झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच स्वतःच्या खेळावर लक्ष केंद्रित करण्यासाठी संघ नेतृत्वाची जबाबदारी रोहित शर्मा सोबत वाटून घेण्याचा निर्णय कोहलीने घेतला आहे असे सांगण्यात येते.

रोहित शर्मा हा विराट कोहलीपेक्षा उत्तम कर्णधार असल्याचे मत आजवर कायमच नोंदवले गेले आहे. मर्यादित षटकांच्या प्रकारात तर कर्णधार म्हणून रोहितचा आलेख कायमच विराटपेक्षा चांगला राहिला आहे. तर रोहित शर्मा हा आयपीएल मधला आजवरचा सर्वात यशस्व कर्णधार आहे. त्यामुळे रोहितची कर्णधार पदी निवड होणे हे त्याच्या योग्यतेला न्याय देणारे ठरेल असे त्याच्या चाहत्यांचे म्हणणे आहे.

Exit mobile version