रोहित शर्मा, दिनेश कार्तिक आणि ग्लेन मॅक्सवेल हे असे फलंदाज आहेत जे आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद झाले आहेत. या तीन फलंदाजांचा १७ वेळा शून्यावर बाद होण्याचा लाजिरवाणा विक्रम आहे. पण आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर फलंदाजांना बाद करणारा गोलंदाज कोण, हे तुम्हाला माहिती आहे का? आज आपण आयपीएल इतिहासात सर्वाधिक वेळा फलंदाजांना शून्यावर बाद करणाऱ्या टॉप-५ गोलंदाजांवर नजर टाकू या.
या गोलंदाजांनी सर्वाधिक वेळा फलंदाजांना शून्यावर केले बाद
लसिथ मलिंगा या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या लसिथ मलिंगाने शून्याच्या धावसंख्येवर सर्वाधिक ३६ फलंदाजांना बाद केले. तर त्यानंतर भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार दुसऱ्या स्थानावर आहे. भुवनेश्वर कुमारने २९ वेळा फलंदाजांना शून्यावर बाद केले आहे. याशिवाय सलग २ मोसमात पर्पल कॅप जिंकणारा भुवनेश्वर कुमार हा एकमेव भारतीय गोलंदाज आहे. तर न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे.
हेही वाचा :
‘अमेरिकेतील भारतीयांच्या मृत्यूमागे अनेक कारणे’
अल्पवयीन यझिदी मुलींचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी आयएसआयएसच्या दोन दहशतवाद्यांना जर्मनीत अटक
मांस-मटन खाण्याच्या मुद्द्यावरून संजय राऊतांकडून ‘इंडी’ आघाडीच्या नेत्यांची पाठराखण
महायुतीच्या संकल्प मेळाव्यास कांदिवली पूर्वमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद
ट्रेंट बोल्ट नव्या चेंडूने घातक गोलंदाज
आयपीएल इतिहासात ट्रेंट बोल्टने ९३ सामन्यांत २६ फलंदाजांना शून्यावर बाद केले आहे. मुंबई इंडियन्स, गुजरात लायन्स आणि चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणारा ड्वेन ब्राव्हो या यादीत चौथ्या स्थानावर आहे. आयपीएलमध्ये ड्वेन ब्राव्होने खाते न उघडता २४ फलंदाजांना बाद केले. त्यानंतर भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादव पहिल्या क्रमांकावर आहे. आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स कडून खेळलेल्या उमेश यादवने २३ फलंदाजांना शून्यावर बाद केले आहे.