दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी रोहित शर्माला दुखापत?

दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी रोहित शर्माला दुखापत?

बहुप्रतिक्षित दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी सोमवारी मुंबईतील सराव सत्रादरम्यान भारताचा कसोटी उपकर्णधार रोहित शर्माला दुखापत झाल्याचे अनेक अहवाल सांगतात. इनसाइडस्पोर्टच्या अहवालात असे म्हटले आहे की थ्रोडाउन स्पेशलिस्ट राघवेंद्रने टाकलेला चेंडू रोहितला हातावर लागली.

अहवालानुसार एकदा त्याच्या हाताला चेंडू लागल्यावर त्याला वेदना होत होत्या. काही काळ दुखत असताना तो उठला आणि ठीक दिसत होता. चाहत्यांना आशा आहे की ही काही गंभीर नसेल. भारतीय सलामीवीर ‘बॉक्सिंग डे’ ला सेंच्युरियन येथे पहिल्या कसोटीसाठी तंदुरुस्त असेल.

हे ही वाचा:

‘म्हणून’ फ्रांससाठी रविवार ठरला ऐतिहासिक

श्रीनगरमध्ये २ दहशतवाद्यांना कंठस्नान

मोदींनी कशी विश्वनाथ मंदिरातून, नागरिकांकडे ‘या’ तीन प्रतिज्ञा मागितल्या

प्रजासत्ताक दिनाला पाच मध्य आशियाई देशांना निमंत्रण

भारतीय बोर्डाकडून (BCCI) याबाबत अधिकृत काहीही नाही. १६ डिसेंबर रोजी तात्पुरत्या स्वरूपात दक्षिण आफ्रिकेला उड्डाण घेण्यापूर्वी भारतीय खेळाडूंना मुंबईत तीन दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात येईल.

रोहितला झालेली दुखापत किती गंभीर आहे, हे अजून समजलेले नाही. अशीच दुखापत अजिंक्य राहणेलाही २०१६ साली झाली होती. त्यात त्याच्या बोटाचे हाड तुटले होते. रोहित शर्माचे पुन्हा लवकर फिट होणे गरजेचे आहे. रोहितकडे फिट होण्यासाठी दोन आठवड्यांचा अवधी असणार आहे. कारण भारताला पहिली कसोटी खेळण्यासाठी केवळ दोन आठवड्यांचा वेळ उरला आहे. जर रोहित शर्मा पहिल्या कसोटी सामन्यापर्यंत फिट नाही झाला, तर मयंक आग्रवाल आणि के. एल. राहुल भारतीय डावाची सुरूवात करू शकतात. सध्या रोहित शर्मा शानदार फॉर्ममध्ये आहे.

Exit mobile version