भारतीय संघाचा आघाडीचा फलंदाज, सलामीवीर रोहित शर्मा हा सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. कर्णधार विराट कोहलीला मागे टाकत रोहित नुकताच आयसीसीच्या कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर आला आहे. यामुळे तो सध्याच्या घडीचा कसोटी क्रिकेटमधील अव्वल भारतीय फलंदाज ठरला आहे. तर आजपासून सुरू होणाऱ्या चौथ्या भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामन्यात रोहित आणखीन एका मोठ्या विक्रमाला गवसणी घालण्याच्या तयारीत आहे.
एक दिवसीय आणि आणि टी२० प्रकारात भारतीय क्रिकेट संघाच्या उपकर्णधार पदाची धुरा सांभाळणारा रोहित शर्मा हा जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी मानला जातो. सुरुवातील रोहित कसोटी क्रिकेटमध्ये आपले स्थान निर्माण करायला अपयशी ठरत होता. पण आता कसोटी क्रिकेटमध्येही चांगला स्थिरावलेला दिसत आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून खेळायला सुरू केल्यापासून रोहितच्या कामगिरीत चांगलाच फरक झालेला दिसत आहे.
हे ही वाचा:
भारत ओव्हलवर ५० वर्षांचा इतिहास मोडीत काढणार?
‘क्लिन चीट’ रिपोर्टसाठी सीबीआय अधिकाऱ्याला देण्यात आली लाच!
सिद्धार्थच्या मृत्यूबद्दल नेटिझन्सना संशय, सुशांतची पुन्हा आठवण
सध्या सुरू असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत तर रोहित हा भारतीय संघासाठीचा सर्वात आश्वासक फलंदाज ठरत आहे. रोहित या मालिकेतील भारताचा सर्वात यशस्वी फलंदाज असल्याचे म्हटले जात आहे. त्याच्या या कामगिरीमुळे आयसीसी क्रमवारीत देखील त्याला चांगला फायदा होताना दिसत आहे. आयसीसीने नुकताच जाहीर केलेल्या क्रमवारीत रोहित चा समावेश जगातील सर्वोत्तम पाच कसोटी फलंदाजांमध्ये करण्यात आला आहे. विशेष म्हणजे त्यांनी भारताचा कर्णधार विराट कोहली याला मागे टाकत हे स्थान पटकावले आहे.
तर दुसरीकडे आजच्या सामन्यात रोहत शर्मा एका विक्रमाला गवसणी घालण्याच्या उंबरठ्यावर आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित शर्मा आपल्या १५ हजार धावा पूर्ण करण्याच्या काठावर आहे. हा विक्रम करण्यापासून रोहित अवघ्या १२ धावा दूर आहे. रोहित शर्मा हा १५ हजार धावांचा टप्पा पार करणारा आठवा भारतीय फलंदाज ठरणार आहे.