टी २० विश्वचषक स्पर्धेच्या सुपर आठच्या शेवटच्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा २४ धावांनी पराभव केला. या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा याची बॅट तळपली. त्याने ९२ धावांची वादळी खेळी केली. टी २० विश्वचषक स्पर्धेतली रोहतची ही सर्वांत मोठी खेळी ठरली. याआधी रोहितने सन २०१०मध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात ७९ धावांची नाबाद खेळी केली होती.
सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाज
रोहित शर्मा याने या सामन्यात वेस्टइंडीजचा दिग्गज फलंदाज ख्रिस गेलचा विक्रम मोडला. त्याच्या नावावर ऑस्ट्रेलिया संघाविरोधात १३२ षटकारांची नोंद झाली. तर, गेलने इंग्लंडविरोधात १३० षटकार ठोकले. तिसऱ्या क्रमांकावर रोहित शर्माच आहे. त्याने वेस्ट इंडीजविरोधात ८८ षटकार ठोकले आहेत.
रोहितने मोडला युवराजचा विक्रम
भारताचा कर्णधार या सामन्यात जबरदस्त फॉर्ममध्ये होता. त्याने युवराज सिंहचा विक्रमही मोडला. टी २० विश्वचषक स्पर्धेत युवराजने इंग्लंडविरोधात सन २००७मध्ये सात षटकार लगावले होते. तर, रोहितने आठ षटकार ठोकून विक्रम मोडला होता. याशिवाय रोहित टी २० आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत भारतासाठी चेंडूंच्या हिशेबाने सर्वाधिक जलद अर्धशतक करणारा पाचवा फलंदाज ठरला. त्याने १९ चेंडूंत ऑस्ट्रेलियाच्या विरोधात अर्धशतक ठोकले. या यादीत आधी युवराज अग्रस्थानी आहे. त्याने सन २००७मध्ये इंग्लंडविरोधात अवघ्या १२ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आहे.
हे ही वाचा:
लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी ओम बिर्ला विरुद्ध के.सुरेश मैदानात!
“आणीबाणी लादणाऱ्या काँग्रेसला राज्यघटनेवर प्रेम व्यक्त करण्याचा अधिकार नाही”
बिर्यानीत लेग पीस नसल्याने लग्नात झाला राडा !
ड्रग्स सेवन करणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात!
षटकारांचे द्विशतक
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात रोहितने ४१ चेंडूंमध्ये ९२ धावांची खेळी केली. या दरम्यान त्याने २२४.३९च्या धावगतीने सात चौकार आणि आठ षटकार खेचले. विशेष म्हणजे टी २० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये षटकारांचे द्विशतक ठोकणारा रोहित शर्मा हा पहिला फलंदाज ठरला. आता रोहितच्या नाववार २०३ षटकारांची नोंद आहे. दुसऱ्या क्रमांकावर मार्टिन गुप्टिल आहे. त्यांनी १७३ षटकार खेचले आहेत. तर, इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर याच्या नावावर टी २० विश्वचषक स्पर्धेत १३७ षटकारांची नोंद आहे. मॅक्सवेल या यादीत चौथ्या तर निकोलस पूरन पाचव्या क्रमांकावर आहे. त्यांनी अनुक्रमे १३३ आणि १३२ षटकार ठोकले आहेत.
टी २० विश्वचषक स्पर्धेत सर्वांत मोठी खेळी
ऑस्ट्रेलियाविरोधात रोहित शर्माने विक्रमाची रांगच लावली. ९२ धावांची खेळी करून तो टी २० विश्वचषक स्पर्धेत भारतासाठी सर्वांत मोठी खेळी करणारा दुसरा फलंदाज ठरला. या यादीत सुरेश रैना अग्रस्थानी आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेविरोधात सन २०१०मध्ये १०१ धावांची वादळी खेळी केली होती. तर, तिसऱ्या स्थानावर विराट कोहली आहे. त्याने सन २०१६मध्ये वेस्ट इंडीजच्या विरोधात ८९ धावा केल्या होत्या. चौथ्या आणि पाचव्या स्थानावर कोहलीच आहे. त्याने सन २०२२मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८२ आणि पाकिस्तानविरुद्ध ८२ धावा केल्या होत्या.