भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना म्हणजे मैदानावरचे युद्धच. दोन्ही संघ जिंकण्यासाठी जीवाची बाजी लावतात. हा सामना म्हणजे दोन्ही संघासाठी करो या मरो असाच काहीसा. पराभव दोन्ही संघांना मान्य नसतो. भारत-पाकिस्तान यांच्यात रंगलेल्या टी-२० विश्वचषकातील सामन्यात टीम इंडिया जिंकेल अशी आशा फारच कमी होती. या कठीण प्रसंगात टीम इंडियाचा कर्णधार आपल्या खेळाडूंचे मनोधैर्य वाढवताना दिसला. त्यानंतर टीम इंडियाने सर्वोत्तम कामगिरी करत पाकिस्तानला लोळवले. भारताने आणखी एका सामन्यात पाकिस्तानला पराभवाचे पाणी पाजले.
पाकिस्तानने आपल्या डावाची सुरुवात केल्यानंतर ठराविक टप्प्यात सामना आल्यानंतर भारताच्या विजयाची शक्यता फारच कमी होती. क्रिकेट चाहत्यांनी टीव्ही बंद केले होते. पण हार मानेल तो भारतीय संघ कसला. भारतीय संघाचा म्होरक्या कर्णधार रोहीत शर्माने भारतीय खेळाडूंचे मनोबल कायम राखले. पाकिस्तान संघाचा डाव सुरू असताना संघातील सर्व खेळाडूंना एकत्र करून सांगितले की, आपण जर ११९ धावांवर ऑल आऊट होऊ शकतो, तर त्यांनाही आपण बाद करू शकतो. रोहितच्या या संदेशानंतर भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तान संघाला सळो की पळो करून सोडले. पाकिस्तान सहज जिंकतोय असा वाटणारा सामना. परंतु बाबर सेनेच्या तोंडातील विजय भारताने हिसकावून घेतला.
हे ही वाचा:
ही तर काँग्रेसची लाचखोरीची गॅरंटी?
राष्ट्रपती भवनात शपथविधीला पोहचला बिबट्या? व्हिडिओ व्हायरल!
‘ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन अथलेटिक्स’च्या खेळाडूंची दमदार कामगिरी!
बोगस बियाणे विक्रेत्यांवर कडक कारवाई करा
टी-२० वर्ल्डकमधील भारत-पाकिस्तान हाय-व्होल्टेज क्रिकेट सामन्यात पावसाचे ढग दाटले होते. भारताने अवघ्या १२० धावा केल्या होत्या. पाकिस्तानचा विजय आता निश्चित असे वाटत असतानाच भारतीय गोलंदाज पाकिस्तानचे कर्दनकाळ ठरले. पाकिस्तानचा संपूर्ण संघ भारतीय संघाच्या ढगफूटीसदृश गोलंदाजीपुढे वाहून गेला. पाकिस्तानबद्दल असे म्हणावंसं वाटतं, भारत-पाकिस्तान सामना खूप रंगला, अन् पाकिस्तान जिंकता जिंकता हरला. पाकिस्तानच्या फलंदाजीची डोकेदुखी ठरला तो जलदगती गोलंदाज जसप्रित बुमराह. बुमराहच्या स्पेलपुढे पाकिस्तान फलंदाजांनी बुम (धूम) ठोकली. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात टीम इंडिया बाजीगर ठरली. जसप्रीत बुमराह टीम इंडियाकडून या विजयाचा नायक ठरला.