हिटमॅनचा आणखीन एक सुपरहिट रेकॉर्ड! ठरला पहिलाच भारतीय

हिटमॅनचा आणखीन एक सुपरहिट रेकॉर्ड! ठरला पहिलाच भारतीय

भारतीय संघाचा उपकर्णधार आणि मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार हिटमॅन रोहित शर्मा याने आणखीन एका अनोख्या विक्रमाला गवसणी घातली आहे. मंगळवार, ५ ऑक्टोबर रोजी झालेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स या सामन्या दरम्यान रोहित शर्माने हा विक्रम केला आहे. विशेष म्हणजे हा विक्रम करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.

मंगळवारी मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांमध्ये आयपीएल सामना रंगला होता. या सामन्यात मुंबई संघाकडून सलामीसाठी कर्णधार रोहित शर्मा उतरला होता. सुरूवातीपासूनच तुफान फलंदाजी करणाऱ्या रोहितने १३ बॉल मध्ये २२ धावा केल्या. रोहित शर्माच्या या खेळीत दोन षटकारांचा समावेश आहे. या षटकारांमुळे रोहित ने टी२० क्रिकेट प्रकारात ४०० पेक्षा अधिक षटकार मारण्याचा विक्रम नोंदवला आहे. हे करणारा तो पहिला भारतीय ठरला आहे.

हे ही वाचा:

गांधीनगर महापालिकेत भाजपाच सरस

तळकोकणात राणेच किंगमेकर! वेंगुर्ला नगरपालिकेत महाविकास आघाडीला धक्का

‘त्या’ १२ षटकांनी वाजवले राजस्थानचे बारा!

रावणाची भूमिका करणारे त्रिवेदी यांचे निधन

रोहित शर्मा हा एक आक्रमक फलंदाज म्हणून ओळखला जात असून अगदी सहजरित्या षटकार मारत चेंडू मैदानाबाहेर भिरकावून देण्यासाठी तो प्रसिद्ध आहे. रोहित कुठल्याही चेंडूला त्याच्या इच्छेनुसार मैदानाबाहेर टोलवण्याची क्षमता ठेवतो. फलंदाज म्हणून रोहितला षटकार मारायला कायमच आवडतात. म्हणूनच आयपीएल मधील आजवरचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरलेल्या रोहित शर्माच्या नावे हा षटकारांचा अनोखा विक्रम नोंदवला गेला आहे.

Exit mobile version